निर्यात साखरेपैकी कोल्हापुरातील २० कारखान्यांना मिळून ५४ हजार ५९८ टन, तर सांगली जिल्ह्यातील ११ कारखान्यांना ३० हजार ३८५ टन साखर निर्यातीचा कोटा मिळाला आहे.
कोल्हापूर : केंद्र सरकारने (Central Government) निर्यातीसाठी जाहीर केलेल्या दहा लाख टन साखरेपैकी महाराष्ट्राच्या वाट्याला तब्बल पावणेचार लाख टन साखर उपलब्ध झाली आहे. केंद्र सरकारने देशभरातील कारखानानिहाय (Sugar Factory) हा कोटा जाहीर केला. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत ही साखर निर्यात करणे बंधनकारक असल्याचे या संदर्भात काढलेल्या आदेशात म्हटले आहे.