केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बेळगावात दाखल

महेश काशीद
Sunday, 17 January 2021

उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी आणि पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी त्यांचे स्वागत केले

बेळगाव : येथील जनसेवक मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आज बेळगावात आगमन झाले. उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी आणि पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी त्यांचे स्वागत केले. 

सांबरा विमानतळावर शहा यांचे आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास आगमन झाले. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, राज्याध्यक्ष नलीनकुमार कटील, गृहमंत्री बसवराज बोम्मई, खासदार इरण्णा कडाडी, आमदार अभय पाटील, महेश कुमठळ्ळी, ऍड. अनिल बेनके, महादेवप्पा यादवाड उपस्थित होते. येथून विशेष विमानाने ते बागलकोटला गेले.

यावेळी मुख्यमंत्री येडियुराप्पा, मंत्री जोशी यांनी त्यांच्यासोबत प्रवास केला. कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर बेळगावला येऊन ते जिल्हा क्रिडांगणावर नियोजित कार्यक्रमामध्ये भाग घेतील. नियोजित कार्यक्रमासाठी व्यापक जागृती करण्यात आली असून, हजारो कार्यकर्त्यांना उद्देशून त्यांचे भाषण होणार आहे. 

हेही वाचा - आरोग्य राज्य मंत्री राजेश पाटील यड्रावकर यांना पोलीसांनी बेळगावात अडवले -

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: central home minister amit shah is on belgaum tour entry in belgaum