करगणी आयुष्यमान आरोग्य मंदिराच्या कामकाजाची सखोल माहिती घेतली. औषधसाठ्याची तपासणी केली. तसेच आरोग्य केंद्रातील स्वच्छतेची पाहणी केली. रुग्णांना दिल्या जात असलेल्या सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले.
CEO Trupti Dhodmise inspecting the health center during an unannounced visit, issuing warnings to absent staff.Sakal
सांगली : ‘‘नियुक्ती असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या मुख्यालयात वैद्यकीय अधिकारी आणि अन्य कर्मचाऱ्यांनी वास्तव्य करावे. यात हयगय केल्यास कारवाई केली जाईल,’’ असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिला.