जीवनावश्‍यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी आता प्रमाणपत्र 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

सांगली- संचारबंदी काळात जीवनावश्‍यक वस्तुंचा तुटवडा पडू नये यासाठी वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. त्यासाठी तालुकास्तरावर उपप्रादेशिक परिवहन विभागाकडील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

सांगली- संचारबंदी काळात जीवनावश्‍यक वस्तुंचा तुटवडा पडू नये यासाठी वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. त्यासाठी तालुकास्तरावर उपप्रादेशिक परिवहन विभागाकडील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

जीवनावश्‍यक वस्तुंची वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी वाहन धारकांनी तहसील कार्यालयाशी संपर्क साधून प्रमाणपत्र प्राप्त घ्यावे. जीवनावश्‍यक वस्तुंची वाहतूक करणारी वाहने आणि अत्यावश्‍यक सेवांमधील वाहनांसाठी ही सुविधा आहे. त्यासाठी ऑनलाईन सुविधाही सुरू करत आहे त्याचाही लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. नियुक्त केलेल्या आरटीओ अधिकाऱ्यांनी संबंधित तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांच्याशी संपर्क साधून आवश्‍यकतेनुसार वाहनांचे अधिग्रहण करावे. तसेच जीवनावश्‍यक वस्तुंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रमाणपत्र देण्याचे आदेश देण्यात आल्याचे डॉ. चौधरी यांनी सांगितले. 

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे म्हणाले, ""आवश्‍यकतेनुसार वाहनांचे अधिग्रहण व जीवनावश्‍यक वस्तुंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रमाणपत्र देण्यासाठी तालुकास्तरावर मोटार वाहन निरीक्षक व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यांची नियुक्ती केली आहे. सांगली मुख्यालय - प्रशांत जाधव (7385389969), प्रशांत दगडे (9975279233), मिरज - आरती देसाई (9422406947), अभिजीत भोसले (9422020028), कवठेमहांकाळ - प्रदिप भाट (9011411904), अश्‍विनी चव्हाण (7507085828), जत - अमर भंडारे (9942999171), किरण कारंडे (8421294328), तासगाव - ए. ए. पुजारी (8055991900), समाधान महानवर (7972995310), विटा - सागर चौगुले (9130459009), अर्चना पवार (7350948662), आटपाडी - नवाब मुजावर (8888544411), गणेश भानवसे (7218187079), इस्लामपूर - अभिजीत पोटे (9021256165), नेहा इदाते (9850079290), शिराळा - विष्णु चव्हाण (9130660102), संजय भोसले (7757930739), कडेगाव - सागर विश्वासराव (9545034411), धनश्री माळी (9970991525), पलूस - शंभुराजे पवार (9822415999), मयुर जगदाळे (7030334444). 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Certificate now for transporting essential goods