esakal | अकरावी प्रवेशासाठी ‘सीईटी’द्या, हक्काने प्रवेश घ्या
sakal

बोलून बातमी शोधा

CET-Exam

अकरावी प्रवेशासाठी ‘सीईटी’ द्या, हक्काने प्रवेश घ्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : अकरावीच्या प्रवेशाबाबत गोंधळात असलेल्या पालकांनी कोणत्याही सोप्या मार्गाची अपेक्षा न करता आपल्या पाल्याला ‘सीईटी’ परीक्षा द्यायला लावावी, असे शिक्षणातील जाणकारांचे मत आहे. ज्या महाविद्यालयात, ज्या शाखेला प्रवेश हवा आहे, तेथे प्रवेशासाठी ही परीक्षा दिलीच पाहिजे. अन्यथा, शिल्लक राहिलेल्या जागांवर मिळेल तेथे प्रवेश घेण्याची वेळ येऊ शकते. त्यावेळी डोक्याला हात लावून उपयोग होणार नाही.

Cet Examination Information Sangli News akb84

कोरोना संकटाने का असेना, मात्र शिक्षण व्यवस्था पूर्णतः बदलून गेली आहे. अकरावी प्रवेशासाठी दहावीच्या गुणांची महत्त्व आहेच, मात्र त्याला यावर्षी सीईटीची जोड महत्त्वाची ठरणार आहे. या शंभर गुणांच्या परीक्षेतून ‘खरे मेरीट’ ठरणार आहे. ही परीक्षा ऐच्छिक आहे. ती दिली तरी चालेल, नाही दिली तरी अकरावीतील प्रवेश थांबणार नाही. परंतु, पंगतीला आधी सीईटी दिलेल्यांचा नंबर असेल आणि त्यातून जे उरेल त्यावर इतरांना दावा करता येईल. राज्य शासनाने २४ जून रोजी जारी केलेल्या एका अध्यादेशानुसार, आता सीईटीची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यात किती विद्यार्थी अर्ज भरणार त्यावरून जिल्ह्यात किती केंद्रांवर परीक्षा होणार, हे निश्‍चित होईल.

हेही वाचा: तारामुंबरी समुद्रकिनारी मच्छिमाराला सापडली देवमाशाची उलटी

सीईटीची परीक्षा द्यावीच, असे मी सांगेन. कारण, परीक्षा ऐच्छिक असली तरी विद्यार्थ्यांना शाखा, कॉलेज निवडीला प्राधान्य देताना ही परीक्षा महत्त्वाची आहे.

- विष्णू कांबळे, शिक्षणाधिकारी

अशी असेल परीक्षा

अकरावी प्रवेशासाठीची परीक्षा दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्रे या विषयांची प्रत्येकी २५ गुणांचे प्रश्‍न असतील. एकूण १०० गुणांची ही बहुपर्यायी प्रश्‍नांची परीक्षा असेल. दोन तास वेळ असेल. यंदा दहावीची परीक्षा झालीच नाही, मात्र यानिमित्ताने विद्यार्थ्यांचा या प्रमुख विषयांचा सराव होईल आणि कुठेतरी मोडलेली स्पर्धात्मक तयारीची सवय पुन्हा लागेल.

एकूण जागा उपलब्ध

शाळा

*संख्या *कला *विज्ञान *वाणिज्य *संयुक्त *एकूण अनुदानित

*१३१ *१३,६४० *८,१२० *४,४४० *२,१४० *२८,३४०

विनानुदानित *४९ *२,२४० *५,५०० *२,२८० *२०० *१०,२२०

स्वयंअर्थसहायित *५८ *७२० *३७६० *५४० *१६० *५१८०

loading image