
मांगले : येथील विस्थापित चांदोली धरण व अभयारण्यग्रस्तांच्या विविध प्रश्नांबाबत आमदार सत्यजित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार शामला खोत-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. खुंदलापूरपैकी शेंडेवाडी वसाहतीतील खातेदारांना ६५ टक्के चलन, भूसंपादन दाखला देण्यासंदर्भात तसेच जमीन वाटप, निर्वाह भत्ता, संकलन रजिस्टर मधील त्रुटी दूर करण्याबरोबरच व पोकळ गट कमी करण्याबाबत चर्चा झाली.