"आज मागण्या मान्य होतील; उद्या होतील, या भरवशावर एक-एक दिवस पुढं ढकलतोय. तरी या शासनाला जाग येत नाही."
शिराळा : ‘सुखाचं चार घास खाऊन म्हातारपणी घरात मुला-बाळांसोबत राहून नातवंडे खेळवायच्या वयात त्यांना हक्काची जमीन व घरदार मिळावं, म्हणून उघड्यावर थंडीत कुडकुडत आंदोलन करण्याची वेळ आली आहे. प्रत्येक वर्षी आमच्या मागण्यांसाठी डॉ. भारत पाटणकर (Dr. Bharat Patankar) यांच्या नेतृत्वाखाली झटतोय.