
मिरज : ‘‘गोरगरिबांचे उत्पन्न वाढवून त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र, राज्य सरकार नेहमीच प्रयत्नशील आहे. तेव्हा प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत देखणी इमारत उभारून गरजवंतांना स्वप्नातील घर देण्यात येत आहे. यापुढेही गोरगरिबांच्या प्राथमिक गरजा पूर्ण करत त्यांच्या घरांचेही स्वप्न पूर्ण करणार,’’ अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिली.