भाजपची ताकद महाडिक यांच्या पाठीशी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

गोकुळ निवडणुकीत भाजप सर्व ताकद महादेवराव महाडिक यांच्या पाठीशीच असेल, असे सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज भविष्यातील राजकारणाची दिशा स्पष्ट केले. एकेकाळी शेतकरी कामगार पक्ष, कॉग्रेस, राष्ट्रवादीचा असणारा हा जिल्हा आता भाजपचा जिल्हा म्हणूनच पुढे येईल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

कोल्हापूर  ः गोकुळ निवडणुकीत भाजप सर्व ताकद महादेवराव महाडिक यांच्या पाठीशीच असेल, असे सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज भविष्यातील राजकारणाची दिशा स्पष्ट केले. एकेकाळी शेतकरी कामगार पक्ष, कॉग्रेस, राष्ट्रवादीचा असणारा हा जिल्हा आता भाजपचा जिल्हा म्हणूनच पुढे येईल, असे मतही त्यांनी व्यक्त केले. हॉटेल अयोध्याच्या वृन्दावन मल्टीपर्पज हॉलमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. त्यात ते बोलत होते. 

हे पण वाचा - कब्रस्तान बनली त्यांची कर्मभूमी.....

पाटील म्हणाले, ""विरोधकांनी मेळाव्याला झालेली ही गर्दी पहावी म्हणजे त्यांना समजेल की, भाजपकडे सत्ता असू दे किंवा नसू दे, आम्हाला काही फरक पडत नाही. भाजपवर लोकांचे प्रेमच आहे. आमच्यावर खालच्या पातळीवर जावून टीका करणाऱ्यांना मी चोख उत्तर दिले आहे. त्याची पुनरावृत्ती नको; पण यापुढे त्यांनी त्याची काळजी घ्यावी. "हम किसोको टोकेंगे नही, हमको टोकेंगे तो; छोडेंगे भी नही'.'' 

हे पण वाचा - सॅकमधून केला जातो हा काळा धंदा....

ते म्हणाले, ""राज्यात तीन पक्षाचे सरकार आले आहे. ही अनैतिक अशी युती आहे. आमच्या घरातून आमचा भाऊ शिवसेनेला चोरुन ही सत्ता घेतली आहे. मलईची सगळी मंत्रिपदे राष्ट्रवादीकडे आहेत. छत्रपती शिवरायांच सन्मान करण्याचे काम नेहमीच भाजपने केले आहे; पण आमच्याकडे बोट दाखविणाऱ्यांनी त्यांच्या आघाडीतून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव गायब कसे केले, याचे स्पष्टीकरण द्यावे. महाशिवआघाडी म्हणता म्हणता त्यांची महाविकास आघाडी असे नामकरण कसे झाले, याचे स्पष्टीकरण द्यावे. भाजप विरोधात सगळे एकत्र आहेत. त्यामुळे आपण त्यांच्याशी संघटीतपणे संघर्ष केला पाहिजे.'' 
माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करणाऱ्या पुस्तकाचे समर्थन केले. यावेळी पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, शौमिका महाडिक यांचीही भाषणे झाली. प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांनीही परगावी जाता जाता मेळाव्याला येवून शुभेछा दिल्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrakant Patil comment on Gokul milk dairy elections