आरक्षणात बदल; पवित्र शिक्षक भरती पुन्हा रखडली 

Changes in reservations; Holy teacher recruitment stalled again
Changes in reservations; Holy teacher recruitment stalled again

कामेरी : राज्यातील अनुदानित, विनाअनुदानित, प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होणारी शिक्षक भरती पुन्हा आरक्षण बदल झाल्याने लांबली आहे. या भरतीला अजून मुहूर्त सापडेना त्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजी पसरली आहे. शासनाने शैक्षणिक संस्थातील शिक्षक भरती पारदर्शी व्हावी या या हेतूने राज्य शासनाने पवित्र पोर्टलची निर्मिती केली. मात्र, या पवित्र भरतीला सुरुवातीपासूनच घरघर लागली, मध्यंतरीच्या काळात शासकीय कोट्यातील 5800 जागा भरल्या उर्वरित जागा 6000 अजून भरणे बाकी आहे. या मध्ये खाजगी शैक्षणिक संस्थांचा मोठा सहभाग आहे. 

या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या आरक्षणामध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास (SEBC) वर्गातील आरक्षणास अंतरिम स्थागिती दिलेली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने याचिकांच्या आधारे शासनाने 23 डिसेंबर 2020 मधील तरतुदीनुसार लॉगिन करुन 14 जानेवारीपर्यंत प्रवर्ग बदल करून घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया पुन्हा रखडली आहे. 

यानंतर आता 25 जानेवारी रोजी मराठा आरक्षणाबाबत सुनावणी होणार आहे. त्यात बदल झाला तर पुन्हा आरक्षणाचा बदल उमेदवारांना करावा लागणार आहे. याला मोठा कालावधी लागणार असल्याने भरती प्रक्रिया पुन्हा रखडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. तरी शासनानेही भरती बाबत ठोस निर्णय घेऊन एकदाचा हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी उमेदवारांतून होत आहे. 

पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती व्हावी यासाठी गेले अनेक वर्ष आम्ही संघटनेच्या माध्यमातून लढा देत आहोत. एसीबीसी या प्रवर्गात जे उमेदवार आहेत व ज्यांना ईडब्ल्यूएस या प्रवर्गाचा लाभ घ्यायचा आहे त्यांना 14 जानेवारीपर्यंत लॉगिन करून बदल करावयाची मुदत दिली आहे. बदलाची मुदत 26 जानेवारी अखेर करावी व त्यानंतर ही भरती प्रक्रिया तत्काळ राबवावी. 
- ऍड. परमेश्वर इंगोले-पाटील, राज्य अध्यक्ष, रयत संकल्प डी. एड्‌., बी. एड्‌ संघटना.


संपादन : प्रफुल्ल सुतार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com