

Ajit Pawar Sangli meeting update
esakal
NCP Ajit Pawar News : मिरजेमध्ये अजित पवार यांची सभा सुरू असताना राष्ट्रवादी अजितदादा गटाचे तडीपार उमेदवार आझम काझी समर्थकांनी दादांना साकडे घालत काझी यांच्यावर केलेल्या कारवाईकडे लक्ष वेधले. यावेळी काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील चार टोळ्यांवर हद्दपारीच्या कारवाईचा बडगा उगारण्यात आला. यामध्ये अजित पवार गटाच्या उमेदवारावर कारवाई करण्यात आली आहे.