
मराठी चित्रपटसृष्टीत सत्तर-ऐंशीचे दशक गाजवणारे चरित्र अभिनेते विलास रकटे यांना वैद्यकीय उपचारासाठी मदतीची गरज आहे त्यांच्या डाव्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यासाठी सुमारे 1 लाख 85 हजार रुपयांचा खर्च आला आहे.
कामेरी : मराठी चित्रपटसृष्टीत सत्तर-ऐंशीचे दशक गाजवणारे चरित्र अभिनेते विलास रकटे यांना वैद्यकीय उपचारासाठी मदतीची गरज आहे त्यांच्या डाव्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यासाठी सुमारे 1 लाख 85 हजार रुपयांचा खर्च आला आहे. सध्याच्या हालाखीच्या आर्थिक स्थितीमुळे त्यांना मदतीची गरज आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड ठरलेल्या सामना चित्रपटासह श्री रकटे यांनी सुमारे पन्नासहून अधिक हिंदी-मराठी चित्रपटांमध्ये विविध प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. प्रतिकार, प्रतिडाव या चित्रपटाची त्यांनी निर्मिती केली. सारे आयुष्य ग्लॅमरस चित्रपट सृष्टीत घालवणारे रकटे आपल्या मुळगावी आता स्थीरस्थावर झाले आहेत. विविध पुरस्काराने सन्मानीत झालेले रकटे गेल्या काही वर्षांपासून गुडघ्याच्या त्रासाने त्रस्त आहेत.
दहा वर्षापूर्वी शस्त्रक्रियाही झाली होती. त्यानंतर आता दुसऱ्या गुडघ्याची शस्त्रक्रिया कोल्हापूर येथील हॉस्पिटल येथे नुकतीच झाली. डॉ. दिपक जोशी यांनी जवळजवळ 75 हजार रुपयांचा वैद्यकीय खर्च माफ केला आहे. शिवराष्ट्र हायकर्स महाराष्ट्र, स्वाभिमानी शेतकरी संघटना, मदत फाउंडेशन कोल्हापूर, सिद्धिविनायक ट्रस्ट मुंबई ,वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन, याचबरोबर वृत्तपत्रक्षेत्रात काम करणारे प्रशांत वसंतराव साळुंखे कोल्हापूर यांनी त्यांना आत्तापर्यंत मदतीचा हात दिला आहे. शस्त्रक्रियेनंतर पुढील औषधोपचाराचा खर्च आहे.त्यासाठी दानशुर व्यक्तींनी मदतीचा हात द्यावा असे आवाहन कुटुंबियांनी केले आहे.
संपादन : प्रफुल्ल सुतार
सांगली