बॉम्बे मिठाई खाताय? मग, सावधान! मिठाईत होतोय रासायनिक रंगांचा वापर; शहरासह ग्रामीण भागात खुलेआम विक्री

Bombay sweets Food Safety Department : तमिळनाडू सरकारनेदेखील या खाद्यपदार्थांवर बंदी घातल्याने कर्नाटकातही अशी बंदी लागू करण्यात आली होती.
Bombay sweets Food Safety Department
Bombay sweets Food Safety Departmentesakal
Updated on
Summary

कॉटन कॅन्डी व गोबी मंच्युरी सारख्या खाद्यपदार्थांत रासायनिक (Chemical) आणि घातक रंगांचा वापर केला जात असल्याचे स्पष्ट झाल्याने ११ मार्च २०२४ रोजी अन्नसुरक्षा विभागाने (Food Safety Department) आदेश बजावत त्यावर बंदी घातली होती.

बेळगाव : आरोग्यास घातक असणाऱ्या रासायनिक रंगांचा बॉम्बे मिठाईमध्ये (Cotton Candy) वापर केला जात असल्याने अन्नसुरक्षा कायदाअंतर्गत शासनाने सहा महिन्यांपूर्वी या मिठाईवर बंदी घातली. त्यामुळे विक्रेत्यांनी रंगहीन बॉम्बे मिठाई (Bombay Sweets) विक्री करण्यास सुरुवात केली होती; पण ही कारवाई थंडावल्यामुळे विक्रेत्यांनी पुन्हा मिठाईमध्ये घातक रंगांचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com