MLA Dr. Vinay Kore : संपूर्ण जगामध्ये राजा कसा असावा याचे आदर्श उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वाधिक काळ वास्तव्य असलेल्या व त्यांच्या पावन अस्तित्वाने गडाला अनेक प्रकारच्या उर्जा मिळाल्या.
MLA Dr. Vinay Kore : संपूर्ण जगामध्ये राजा कसा असावा याचे आदर्श उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज
sakal
Updated on

पन्हाळा - छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वाधिक काळ वास्तव्य असलेल्या व त्यांच्या पावन अस्तित्वाने गडाला अनेक प्रकारच्या उर्जा मिळाल्या. अशा पन्हाळगडावर संपूर्ण जगामध्ये राजा कसा असावा? याचे आदर्श उदाहरण असलेल्या व ज्यांच्या आचार व विचारामूळे आपण तारलो गेलो.

अशा छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५ वी जयंती साजरी करण्याचे भाग्य आम्हाला केंद्र शासनाच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयामुळे लाभले याच पन्हाळगडावर शाहू महाराजांनी बनवलेल्या छत्रपतींच्या पहिल्या मंदिरातून शिवजयंती निमित्य राज्याच्या काना कोपऱ्यातून असंख्य शिवभक्त शिवज्योती आपापल्या गावी घेऊन जातात ती शिवज्योत प्रत्येकाच्या मनामध्ये शिवविचार जागृत ठेवेल असे प्रतिपादन आमदार डॉ. विनय कोरे यांनी केले ते शिवजयंती निमित्य केंद्र शासनाणे आयोजित केलेल्या राज्यव्यापी कार्यक्रमात बोलत होते.

या कार्यक्रमात बोलताना कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पन्हाळगडाचा इतिहास सांगत स्वराज्याची राजधानी असलेल्या पन्हाळगडावर छत्रपतींची ३९५ वी जयंती साजरी करण्याचा मान मिळालेबद्दल केंद्र शासनाचे आभार मानले तर जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तीकेयन एस. यांनी छत्रपती हे महाराष्ट्राचे नाहीतर संपूर्ण जगाचे युगपुरुष आहेत.

कारण मी तामिळनाडूचा असून तेथे आजही लहान मुलांना छत्रपतींच्या गोष्टी सांगितल्या जातात. मी माझ्या आईकडून छत्रपतींच्या कथा एकल्या आहेत. त्या मला खूप आवडायच्या असे सांगत भारतीय प्रशासनिक सेवेत रुजू झाल्यानंतर मला महाराष्ट्रात येण्याची संधी मिळाली. व कोल्हापूर सारख्या ऐतिहासिक ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली असे सांगितले.

त्यानंतर मान्यवरांचे हस्ते दिपप्रज्वलन व राष्ट्रपती पदक विजेते अयुबखान अकबर मुल्ला यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी केंद्रशाळा गावळेवाडी मर्दानी खेळ, संजीवन पाळणा गीत, कुमार पन्हाळा विद्यामंदिर लेझिम, पन्हाळा विद्यामंदिर लाठीकाठी असे सांस्कृतिक कार्यक्रम सदर केले.

तर विजयालक्ष्मी भोसले व राक्षी येथील अनिरुद्ध खोत यांच्या भाषणांनी उपस्थितांची माने जिंकली. त्यानंतर आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते पन्हाळागडाची शौर्य गाथा सांगणाऱ्या पन्हाळगडाचा रणसंग्राम या लघुपटाचे अनावरण करण्यात आले.

शिवमंदिरातील शिवजन्मकाळ व पाळण्याने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी खासदार धैर्यशील माने, चंदगडचे आमदार शिवाजी पाटील, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासाहेब पवार, कार्यकारी अभियंता सा. बा. चंद्रकांत आयरेकर, सारथीच्या सह व्यवस्थापिकीय संचालिका किरण कुलकर्णी, प्रांतधिकारी समीर शिंगटे, पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे जाधव, पन्हाळा गटविकास अधिकारी सोनाली माडकर, नगरपरिषद मुख्याधिकारी चेतनकुमार माळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोंबले व मोठ्या संखेने शिवभक्त उपस्थितीत होते.

पन्नास वर्षापूर्वीच्या आठवणींना उजाळा

छत्रपतींच्या राज्याभिषेकला तीनशे वर्ष पूर्ण झाल्याच्या प्रित्यर्थ १९७४ साली राज्यसरकारच्या सहयोगाने पन्हाळा नगरपरिषदेने त्रिशत मोहत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी छत्रपतींच्या राज्याभिषेकाची प्रतिकृती उभारली होती. तेव्हा परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

तो महोत्सव लोकोत्सव झाला होता. त्याचप्रमाणे आज पन्हाळगडावर साजरा झालेळा ३९५ वा शिवजयंती सोहळा लोकोत्सव झाला. त्यामुळे १९७४ च्या त्रिशत मोहत्सवाची आठवण झालेचे पन्हाळ्यातील जेष्ठ नागरिक संभाजी गायकवाड व अनंत हावळ यांनी सकाळशी बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com