Video : जिल्हा परिषदेत रंगली पार्टी; अहाे ! रोज खावा चिकन आणि अंडी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 2 February 2021

गेल्या काही महिन्यापासून bird flu चे वारे जगभर पसरू लागले आहे. यातून अफवांच्या पिकाचे जाळे पसरले आहे. यातून मासांहार प्रेमींमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे

सांगली : गेल्या काही महिन्यापासून bird flu चे वारे जगभर पसरू लागले आहे. यातून अफवांच्या पिकाचे जाळे पसरले आहे. यातून मासांहार प्रेमींमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हीच भिती दूर करण्यासाठी सांगली जिल्हा परिषदेने पुढाकार घेत  चिकन पार्टी भरवली. चिकन फ्राय, चिकन लॉलीपॉप, चिकन बिर्याणी, उकडलेली अंडी यावर ताव मारत बर्ड फ्लूबाबत जागृती मोहिम हाती घेतली आहे.

जिल्हा परिषदेत "चिकन पार्टी'

सांगली जिल्ह्यात bird flu चा कोणताही प्रादुर्भाव झालेला नाही, याबाबत जागृती करण्यासाठी  जिल्हा परिषदेत चिकन पार्टी रंगली. चिकन बिर्याणीवर ताव मारत पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बिनधास्त चिकन, अंडी खाण्याचा संदेश दिला.
 विविध पोल्ट्री व्यावसायिकांच्या पुढाकारने जिल्हा पशुसंवर्धन विभागाने या पार्टीचे आयोजन केले होते. जिल्ह्यात पोल्ट्री व्यवसाय मोठ्या  प्रमाणात आहेत. चिकन आणि अंडीला मागणी प्रचंड आहे. त्यावर bird flu चा कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी ही दक्षता घेण्यात आली. काही लोकांत भितीचे वातावरण आहे. तेही दूर करण्याचा प्रयत्न यातून झाला. 

 

चिकन फ्राय, चिकन लॉलीपॉप, चिकन बिर्याणी, उकडलेली अंडी यावर ताव मारला. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग यांनी स्वतः सर्वांचे आदरातिथ्य केले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे, उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, सभापती जगन्नाथ माळी, आशाताई पाटील, संजीव पाटील, संभाजी कचरे आदींनी उपक्रमास शुभेच्छा दिल्या.पोल्ट्री कंपन्यांचे प्रतिनिधी सी. वसंतकुमार, मनोज कुलकर्णी, डॉ. कृष्णा पोळ, डॉ. संजय देशपांडे आदी सहभागी झाले. कोमार्ला ग्रुप, नंदा ग्रुप, सगुणा ग्रुप, ऍग्रोवेट, प्रिमियम, व्हेट सर्व्हिसेस, एआरके न्यूट्रीशन, व्यंकटेश ऍग्रोवेट, महाराष्ट्र वेट, ओमसाई सेल्स, क्वॉलिटी फिड, व्यंकी आदींनी त्याचे संयोजन केले. 

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chicken Party in Zilla Parishad bird flu marathi news sangli