मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूरात दाखल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 डिसेंबर 2018

सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज (ता. 17) सोलापूर विमानतळावर आगमन झाले. सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजय देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

सकाळी साडेदहाच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विमानतळ येथे आगमन झाले. त्यांच्या सोबत महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील होते. यावेळी पोलीस आयुक्त महादेव तांबडे, महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले. 

यावेळी महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाचे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे, महापालिकेचे सभागृह नेता संजय कोळी, भारतीय जनता पक्षाचे शहाजी पवार, प्रा अशोक निंबर्गी, वीरभद्रेश बसवंती,  उपजिल्हाधिकारी शिवाजी जगताप, सहाय्यक पोलीस आयुक्त अभय डोंगरे आदी उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Minister Devendra Fadnavis reached at Solapur