मुख्यमंत्र्यांनी साताऱ्यातील शब्द पाळला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

राजे तुम्ही आदेश द्या मी सर्व ती कामे मार्गी लावताे असे सभेत मुख्यमंत्री फडवणीस यांनी जाहीर केले हाेते.

सातारा ः साताऱ्याची हद्दवाढ मंजूर झाली असून रविवारी (रात्री) मुख्यमंत्र्यांनी माजी आमदार शिवेंद्रसिंहराजेंशी यांना या बाबतची सूचना कऱ्हाड येथे रात्री अकरा वाजता दिली. तसेच सातारा शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या कॉंक्रीटी करण्यास 50 कोटींचा निधी मंजूर केला आहे.

सोमवारी, ता. 15 महाजनादेश यात्रेनंतर झालेल्या सभेत शिवेंद्रसिंहराजेंनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केली होती. त्याबाबत रात्रीच दोन्ही विषय मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंजूर केले अशी माहिती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कार्यालयातून देण्यात आली. 

राजे तुम्ही आदेश द्या मी सर्व ती कामे मार्गी लावताे असे सभेत मुख्यमंत्री फडवणीस यांनी जाहीर केले हाेते. त्यानंतर रात्रीतच मुख्यमंत्र्यांनी सातारा शहराची हद्दवाढ मंजूर केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Chief Minister followed his words from satara