
Gopichand Padalkar Sangli : ‘‘धर्मांतरासाठी यापुढे कोणी प्रयत्न केल्यास हिंदुत्ववादी कार्यकर्तेच संबंधिताला कठोर शासन देतील,’’ असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला. धर्मांतर व ‘लव्ह जिहाद’ कायद्याला मुख्यमंत्री सकारात्मक असून लवकरच तो अस्तित्वात येईल, असा विश्वास आमदार गोपीचंद पडळकर यानी व्यक्त केला.
कुपवाडमधील विवाहिता ऋतुजा सुकुमार राजगे यांनी धर्मांतरासाठी होत असलेल्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची फिर्याद कुपवाड पोलिस ठाण्यात नोंद आहे. आज त्या विवाहितेला श्रद्धांजली वाहण्यासाठी स्टेशन चौकापासून राम मंदिरापर्यंत मोर्चा काढण्यात आला.