चिक्कोडी : येडूरवाडीतील खून अनैतिक संबंधातून

दोन आरोपींना अटक अंकली पोलिसांची कारवाई
खूनप्रकरणी दोन आरोपींना अंकली  पोलिसांनी अटक केली.
खूनप्रकरणी दोन आरोपींना अंकली पोलिसांनी अटक केली. sakal
Updated on

मांजरी: येडूरवाडी ता. चिक्कोडी येथे काल (ता. २७) झालेल्या अनिल बाळू सावळे याच्या खूनप्रकरणी दोन आरोपींना अंकली पोलिसांनी अटक केली. अनैतिक संबंधातून ही घटना घडली आहे. भरमू कृष्णा जडे (वय 30, रा. येडूरवाडी) व सिद्धेश्वर उर्फ पप्पू अण्णाप्पा वंटगे (वय 25, मुळगाव नाईंग्लज, सध्या रा. येडूरवाडी) अशी आरोपींची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, आरोपी भरमू कृष्णा जडे याचा भाऊ मल्लाप्पा जडे यांच्या पत्नीबरोबर मयत अनिल सावळे याचे अनैतिक संबंध होते. या कारणावरूनच आरोपी भरमू जडे व त्याच्या वहिणीचा भाऊ सिद्धेश्वर उर्फ पप्पू अण्णाप्पा वंटगे यांनी मयत अनिल याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा मांजरी येथील हद्दीत खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह येडूरवाडी येथील हद्दीत टाकण्यात आला होता. मयत अनिल याला वारंवार सांगूनही त्याने आरोपीच्या वहिनीबरोबर असलेले अनैतिक संबंध बंद केलेले नव्हते. यासाठी गावांतील मान्यवरांनी न्यायनिवाडा देखील केला होता. त्याने अनैतिक संबंध सुरूच ठेवल्याच्या रागातून ही घटना घडली आहे, अशी नोंद पोलिस स्थानकात करण्यात आली आहे.

मयत अनिल सावळे याच्यावर वार करण्यासाठी वापरण्यात आलेली शस्त्रे व अन्य साहित्याचा आज सकाळपासून अंकली पोलिस स्थानकाचे कर्मचारी व चिक्कोडीचे मंडल पोलिस निरीक्षक आर. आर. पाटील यांनी शेतात कसून शोध घेतला. मात्र त्यांना सायंकाळी उशिरापर्यंत काहीच मिळाले नसल्याचे सांगण्यात आले. सदर दोन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली असून पुढील तपास अंकली पोलिस करत आहे.

चोवीस तासात खूनाचा छडा

या खूनप्रकरणी चिक्कोडीचे मंडल पोलिस निरीक्षक आर. आर. पाटील, अंकली पोलिस स्थानकाचे प्रभारी उपनिरीक्षक भरतगौडा, त्यांचे सहकारी आर. एस. खोत, अनिल सप्तसागरे, सिदकुमार परमानहट्टी, सुरेश पुजारी, गजानन कांबळे, रमेश मुद्दीनमनी व इतर सहकाऱ्यांनी कसून तपास केला. तसेच आरोपींना चोवीस तासांत अटक करून खूनाचा छडा लावल्याने पोलिसांचे कौतूक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shaktipeeth Highway Protes
Sangram Jagtap statement on Kesarekar murder
Tukaram Mundhe effect on Food and Drug Administration action
Krishna river water diversion project for Solapur
Marathi News Esakal
www.esakal.com