चिक्कोडी : 'राजमा' पिकामुळे शेतकऱ्यांना फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजमा' पिकामुळे शेतकऱ्यांना फटका

चिक्कोडी : 'राजमा' पिकामुळे शेतकऱ्यांना फटका

चिक्कोडी : तालुक्यासह ग्रामीण भागातील बहुतांश शेतकरयांनी रोटर मारून तीन फुटी सरी सोडून जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात 'राजमा' बियाणांची लागण केली होती. मात्र अवकाळी पावसामुळे या पिकाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. तालुक्यातील शेतकरयांचा कल उसासह आंतरपिके घेण्याकडे वाढला आहे. सध्या ऊस लावणीत मिरची, शेंगा, भुईमूग, फ्लॉवर, कोबी, कोथिंबीर, मेथी, पालक, भाजीपाला पिके घेतली जात आहेत. 2019 पासून महापूर, अतिवृष्टीमुळे ऊस पिकांना फटका बसत आहे. त्यामुळे बँकेकडून घेतलेले कर्ज फेडण्याच्या विवंचनेत शेतकरी आहे. जून महिन्यापासून पावसाळ्याला सुरुवात होण्याआधी अडीच, तीन महिन्यातील खरीप पिके घेऊन कर्ज व कुटुंबाला हातभार लावावा.

यादृष्टीने बहुतांश शेतकरयांनी राजमा बियाणांची लागण केली. 110 दहा रुपये किलोने बियाणे आणून त्याची टोकणणी केली. मजुराला शंभर रुपये पगार दिला. औषध फवारणी करून राजमा पिके जोमात आली होती. पण एप्रिलमध्ये अवकाळी पावसाने ही पिके वाया गेली आहेत.

राजमा एकरी पिकाचा खर्च

शेतात रोटर मारून सरी सोडणे एकरी*3500 रुपये.

राजमा बियाणे*एका किलोला 100 ते 110

एकराला लागणारे मजूर 10 * 1000 रुपये.

औषध फवारणी * तीन ते चार वेळा *1500 ते 1800

भांगलण * एकरी 10 ते 15 मजूर * 1000 ते 1500 रुपये.

ऊस पीक काढून शेतात रोटर मारून तीन फुटी सरी सोडून राजमा बियाणांची लागण केली होती. पीके जोमात आली होती. पण अवकाळी पावसामुळे हातात आलेली पीक वाया गेल्याने नुकसान झाले आहे.

-चिदानंद संकपाळ,शेतकरी, मलिकवाड.

Web Title: Chikkodi Rajma Crop Farmers

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top