
चिक्कोडी तालुक्यात 3 लाख 74 हजार नागरीकांनी घेतला डोस
चिक्कोडी : दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा ओमिक्राॅन व्हेरीयंट आढळून आला आहे. सदर संसर्ग घातक असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने खबरदारी घेत राज्यभरात कडक नियमावली जारी केली आहे. इतर राज्यांच्या सीमाभागावर तपासणी केली जात आहे. तसेच आरटीपीसीआर निगेटीव्ह अहवाल अथवा कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांनाच राज्यात प्रवेश दिला जात आहे. चिक्कोडी तालुक्यात आजपर्यंत पहिला डोस 2 लाख 45 हजार 814 तर दुसरा डोस 1 लाख 29 हजार 61 असे एकूण 3 लाख 74 हजार 875 इतके लसीकरणाचे डोस उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. सीमाभागातील दोन्ही डोस न घेतलेले नागरिकांची गोची झाली आहे.तालुक्यात अद्याप कोरोनाचा पहिला डोस 2 लाख 45 हजार 814 नागरिकांनी घेतला आहे. मात्र दुसरा डोस घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचे चित्र दिसून आले आहे. कोरोनाचा नवीन ओमिक्रॅन व्हेरियट जगभरात डोकेदुखी ठरला आहे. त्यामुळे खबरदारीसाठी नवीन नियमावली जारी केली असून मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. काही ठिकाणी विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.
कोरोना प्रतिबंधक लस न घेतल्यास कोरोनाचा धोकाही कायम आहे. लसीकरणाबाबत जागृती करूनही मुबलक प्रमाणात लसी उपलब्ध असतानाही लस घेण्याकडे नागरिकांनी दुर्लक्ष केले आहे. कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्याने लसीकरणाची गरज नाही. कोरोना गेला आहे असे मानून अनेकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली आहे. परंतु आता सरकारने कठोर नियम जारी केल्याने लसीकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या नागरिकांना त्याचा फटका बसणार आहे.
हेही वाचा: शालेय विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास
चिक्कोडी तालुक्यातील केंद्रेउद्दिष्ट पहिला डोस दुसरा डोस
अंकली 19995-17729-12157
जी.एच.चिककोडी 32715-33030-16019
एकसंबा 11155-11719-7692
इंगळी 6748-6343-5072
केरुर 26719-20597-11707
खडकलाट 28388-22591-16583
पट्टणकुडी 24944-21025-8830
मांजरी 8168-7331-4497
सदलगा 22013-17359-9488
येडुर 14515-12860-6269
केएलई हॉस्पिटल चिक्कोडी 10240-728
जैनापूर 19805-18531-10161
करगाव 22763-20412-27842
कब्बूर 31966-26047-12016
तालुक्यातील कोरोना लसीकरणाचा पहिला डोस पूर्ण होत आला आहे. सध्या ओमिक्राॅनचा संसर्ग आढळून आल्याने नागरिकांची दोन्ही डोस घेण्यास गर्दी वाढली आहे. सध्या नागरिकांनी खबरदारी घेऊन मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा.
-डॉ. व्ही. व्ही. शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी, चिक्कोडी.
Web Title: Chikkodi Taluka 3 Lakh 74 Thousand Citizens Took Dose
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..