मुलाचे ट्विट आणि आईवर उपचार सुरू! 

Child's tweet and mother treatment started
Child's tweet and mother treatment started

इस्लामपूर : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे बहुतांश चांगले अनुभव नागरिकांना येऊ लागले आहेत. विशेषतः सोशल मीडियावर जे काही चालते त्याची बऱ्या आणि वाईट अर्थाने दखल घेतली जात आहे. आज वाळवा तालुक्‍यात असाच एक अनुभव आला. एका मुलाने आपल्या आईच्या आजाराचे ट्विट केले आणि सांगली जिल्हा परिषद तसेच वाळवा पंचायत समिती प्रशासनाने त्याची तत्काळ दखल घेऊन त्याच्या आईवर उपचार सुरू केले.

याबाबत अधिक माहिती अशी : वाळवा तालुक्‍यातील करंजवडे येथील एका युवकाने आज ट्विटरवर आपल्या आईच्या आजारपणाचा त्रास ट्विट केला. त्याने जिल्हा परिषद सांगली, जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना टॅग करत म्हटले की, "मी प्रतीक पाटील, एका समस्येवर आपले लक्ष वेधत आहे. माझ्या आईवर इस्लामपूर येथील एका रुग्णालयात उपचार सुरू होते, नंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तिला घरी पाठवण्यात आले,

सध्या आईची मानसिक स्थिती योग्य नसल्याने जवळपासच्या कोणत्याही एका रुग्णालयात दाखल करण्यात यावे.' याची दखल घेत सांगलीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी वाळवा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे यांना तातडीने संपर्क साधून कार्यवाहीच्या सूचना दिल्या आणि वाळवा तालुका आरोग्य विभागाने डॉ. साकेत पाटील यांच्या प्रयत्नांतून तत्काळ प्रतीक यांच्या आईला इस्लामपूर येथील एका रुग्णालयात उपचार देखील सुरू केले! 

गैरसोय होऊ नये यासाठी  प्रयत्न

जिल्हा प्रशासनाकडून सूचना येताच कार्यवाही केली. कोणताही गंभीर आजार असणाऱ्यांनी आरोग्य विभागाशी संपर्क साधून रुग्णांची माहिती द्यावी. कुणाचीही गैरसोय होऊ नये यासाठी आमचे प्रशासन प्रयत्नशील आहे.

- शशिकांत शिंदे, गटविकास अधिकारी, वाळवा पंचायत समिती 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com