रॅपिड अँटीजेन चाचणीला नागरिकांनी सहकार्य करावे : महापौर गीता सुतार

बलराज पवार
Tuesday, 28 July 2020

सांगली-  महापालिकेच्या वतीने करण्यात येत असलेल्या रॅपिड अँटीजेन चाचण्यांना नागरिकांनी सहकार्य करावे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. त्याला साथ द्यावी असे आवाहन महापौर गीता सुतार यांनी केले आहे.

सांगली-  महापालिकेच्या वतीने करण्यात येत असलेल्या रॅपिड अँटीजेन चाचण्यांना नागरिकांनी सहकार्य करावे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. त्याला साथ द्यावी असे आवाहन महापौर गीता सुतार यांनी केले आहे.

महापौर सुतार म्हणाल्या, महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्याचा प्रसार वेगाने होत आहे. हा प्रसार रोखण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवून कोरोनाची लागण झालेले रुग्ण शोधणे महत्वाचे आहे. त्यामुळे कोरोनाची लक्षणे नसलेले पण कोरोना झालेले रुग्ण सापडल्यास त्यांच्यावर तातडीने उपाय करणे आवश्‍यक आहे. यामुळे या संसर्गाची साखळी तोडणे शक्‍य होणार आहे. 

"कोविड19' कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखणेसाठी महापालिकेतर्फे महापालिका क्षेत्रामध्ये 50 वर्षावरील नागरीकांची रॅपीड अँटिजेन टेस्ट करणेत येत आहे. शहराच्या विविध भागात ही दाट लोकवस्तीच्या परिसरात, कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांची चाचणी करण्यात येत आहे. यामुळे महापालिका क्षेत्रामधील नागरीकांना कोरोनाची लक्षणे लगेच कळून येणार आहेत. पॉझिटीव्ह रुग्णांवर तात्काळ उपचार सुरु झाल्यास परिसरात व्हायरस प्रसार आपल्याला रोखणे शक्‍य होणार आहे. आपल्या महापालिका क्षेत्रात वाढती रुग्ण संख्या पहाता ही टेस्ट फार गरजेची झाली आहे. त्यामुळे नागरीकांनी ही टेस्ट करुन घेण्यास सहकार्य करावे व महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रसार रोखणेस प्रशासनास साथ दयावी असे आवाहन करत आहे, असे महापौर सुतार म्हणाल्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens should cooperate in rapid antigen testing: Mayor Geeta Sutar