"या' शहराचा होणार एशिया बुकमध्ये नोंद

Neurotherapy Camp
Neurotherapy Camp
Updated on

सोलापूर : येथील आयुर्वेदिक न्यूरो हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर व श्री ओंकार आयुर्वेदा न्यूरोथेरपी व ऍक्‍युप्रेशर चिकित्सालय यांच्यातर्फे आयोजित सहादिवसीय मोफत न्यूरोथेरपी शिबिरात एकूण 12 हजार 500 रुग्णांवर उपचार करण्यात आले. हैदराबाद रोड विडी घरकुलजवळील पत्रेवाला पार्क येथे आयोजित या शिबिराचा प्रारंभ सोमवारी (ता. 13) झाला होता. शिबिरात दररोज दोन ते अडीच हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले. शनिवार (ता. 18) पर्यंत शिबिर सुरू होते.

विविध आजारांवर झाले उपचार
या शिबिरात लकवा, मानदुखी, फ्रोजन शोल्डर, व्होकल कोर्ड, मासिक धर्मविकार, संधिवात, वातविकार, स्लीप डिस्क, टेनिस एल्बो, गर्भाशयातील गाठी, गुडघेदुखी, टाचदुखी, पाठदुखी, सेरेब्रल पाल्सी, कंबरदुखी, सांधेदुखी, अर्धशिशी, नाभी संतुलन आदी विविध आजारांवर न्यूरोथेरपीने उपचार करण्यात आले. शनिवारी शिबिराचा समारोप करण्यात आला. या वेळी कोटा येथील आयुर्वेदिक न्यूरो हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे प्रमुख डॉ. मनोज शर्मा, होटगी मठाचे मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी, नागणसूरचे श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी, आर्ट ऑफ लिव्हिंगचे समन्यवक लक्ष्मण भंडारी, प्रशिक्षक भालचंद्र पगड्याल, श्रीधर सुरा, वैद्य नागेश आकेन, वंदना मामड्याल, निशा आकेन, भूमेश कानुगंटी, सायण्णा द्यावरकोंडा, पुरुषोत्तम सग्गम, सतीश सिद्राल, सतीश सिरसिल्ला आदी उपस्थित होते.

गोव्याचा विक्रम निघाला मोडीत
गोव्यात 2018 मध्ये आयोजिलेल्या न्यूरोथेरपी शिबिरात 10 हजार जणांनी सहभाग घेतल्याची नोंद एशिया बुकमध्ये झाली होती. याच धर्तीवर सोलापुरात असे शिबिर घेण्याचा संकल्प करण्यात आला. यासाठी 60 खाटांची व स्त्रियांसाठी स्वतंत्र सोय केली होती. 100 वैद्य, आर्ट ऑफ लिव्हिंगचे 150हून अधिक स्वयंसेवक कार्यरत होते. संयोजकांच्या योग्य नियोजनामुळे साडेबारा हजार रुग्णांवर उपचार करून गोव्याचा विक्रम मोडण्यात आला व नवीन विक्रम प्रस्थापित करण्यात सोलापूरच्या संयोजकांना यश मिळाले. संकल्प यशस्वी झाल्याबद्दल या वेळी संयोजक वैद्य नरसिंहस्वामी मामड्याल यांनी शहरवासीयांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

What is Property Card in Maharashtra?
Muslim Gorakshak Dal in Miraj
Sangli Vishrambag Savarkar statue issue
Sangli Accident News Konkan tourism
Marathi News Esakal
www.esakal.com