
मिरजेत दोन गटांत राडा, जातीविषयी द्वेष निर्माण करणारे वक्तव्य
esakal
मुख्य ठळक मुद्दे (Highlights Summary)
मिरजेत दोन गटांत राडा: आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ दोन समाजांमध्ये वाद वाढून दगडफेक, मारहाण आणि गोंधळ झाला.
पोलिसांचा तत्पर हस्तक्षेप: परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला; मोठा फौजफाटा तैनात.
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन: पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन करत अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला.
Miraj Police News : मिरज येथे आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने मिरजेत दोन गटांत राडा झाला. संतप्त जमावाकडून संशयिताच्या घरावर दगडफेक करण्यात आली. यानंतर मिरज शहरात सर्वत्र दुकाने रॅली काढून बंद करण्यात आली. गोंधळ माजवणाऱ्यांना पोलिसांनी खाक्या दाखवत पांगवले. या घटनेमुळे मिरज शहरात रात्री उशिरापर्यंत तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.