Jaysingpur Heavy Rain
sakal
जयसिंगपूर - शहरात मंगळवारी (ता.दोन) सायंकाळी ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार उडवून दिला. पहिल्याच पावसात शहरातील जवळपास शंभरहून अधिक घरांमध्ये पाऊस आणि गटारींचे पाणी शिरले. शहरातील मार्गांवर पुरसदृश परिस्थिती पहायला मिळाली. अनेक घरांवरील पत्रे उडून गेले तर काही अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये सात ते आठ फूट पाणी साचून राहिल्याने गाड्यांना अक्षरश जलसमाधी मिळाली. शहरातील जवळपास सर्वच प्रमुख मार्गांवर वाहतुकीचे प्रचंड कोंडी निर्माण झाली.