raju shetty
sakal
कडेगाव (जि. सांगली) - राज्यातील साखर कारखाने काटामारी, रिकव्हरी चोरी करत आहेत. हे आम्ही वारंवार सांगितले. पण सरकारने झोपेचे सोंग घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच पूरग्रस्तांना मदत म्हणून ऊस बिलातून प्रतिटन १५ रुपये कपात करण्याचे वक्तव्य केले होते. मी त्यावर आवाज उठविल्यावर त्यांनीच ‘साखर कारखाने काटामारी करत आहेत’ असे सांगितले.