आमचं काम पाहून विरोधकांच्या पोटात दुखतंय, त्यामुळं ते शिव्याशाप देताहेत; मुख्यमंत्री शिंदेंचा जोरदार निशाणा

‘सांगली जिल्हा म्हटले की स्वातंत्र्य चळवळीची आठवण होते. प्रतिसरकारने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते.'
CM Eknath Shinde
CM Eknath Shindeesakal
Summary

‘बाळासाहेबांचे विचार, आचार आणि भूमिका घेऊन आम्ही सरकार स्थापन केले. जनतेच्या भल्याचे निर्णय घेतले.'

इस्लामपूर : महिला (Women) सक्षमीकरणाच्या केवळ गप्पा न मारता राज्य सरकारने त्यासाठी काम केले. बचत गटांचे खेळते भांडवल १५ हजार रुपयांवरून २० हजार इतके केले. त्यांच्या उत्पादनाच्या ब्रँडिंगसाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी, असे आदेश दिलेत. आमचे काम पाहून विरोधकांच्या पोटात दुखते आहे. त्यामुळे ते शिव्याशाप देत आहे. त्याशिवाय त्यांच्याकडे दुसरे काम नाही, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी येथे केली.

नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये तत्काळ खात्यात जमा होतील, अशी ग्वाही त्यांनी येथे दिली. इस्लामपूर (Islampur) येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमात ते बोलत होते. पालकमंत्री सुरेश खाडे, उपसभापती नीलम गोऱ्हे, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई (Shambhuraj Desai), खासदार धैर्यशील माने, आमदार सुधीर गाडगीळ, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, माजी मंत्री सदाभाऊ खोत, अण्णासाहेब डांगे, भाजप जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक, शिराळा विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष सम्राट महाडिक, सुहास बाबर, सत्यजित देशमुख, कपिल ओसवाल, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, आयुक्त सुनील पवार, जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे आदी उपस्थित होते.

CM Eknath Shinde
देशाला कायमचं कर्जात बुडवून मोदी एक दिवस संन्यासाला जातील; भाजप, काँग्रेससह पंतप्रधानांवर आंबेडकरांची सडकून टीका

यावेळी कॉफी टेबल बुक, कृष्णामृत पुस्तकाचे प्रकाशन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘सांगली जिल्हा म्हटले की स्वातंत्र्य चळवळीची आठवण होते. प्रतिसरकारने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. अनेक मोठी माणसे या मातीने घडवली. या मातीतील माणूस आज सरकारच्या बाजूने उभा आहे. तुम्ही लोकाभिमुख सरकारवर विश्वास दाखवला आहे. विविध शासकीय योजनांतून जिल्ह्यात ३५ लाख लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे. शासन आपल्या दारी योजनेत साडेचार कोटी लोकांना लाभ मिळाला आहे. यापूर्वी योजनेच्या लाभार्थ्यांना अनेक त्रास सहन करावे लागत होते. लाभार्थी योजनेचा नाद सोडून देत होते. जर नीट लाभ मिळत नसेल तर या उपयोग काय? या योजनांना आमच्या सरकारने गती दिली. आमचे सरकार घरात बसून काम करीत नाही. लोकांच्या घरात जाऊन मदत करते.’

CM Eknath Shinde
CM Eknath Shinde

ते म्हणाले,‘‘आधीचं सरकार फेसबुक लाईव्ह होतं, आमचं सरकार लोकांच्या बांधावर जाऊन समस्या ऐकून घेतं. त्या सोडवतं. कामाच्या पातळीवर आमचा देशात पहिला नंबर येईल. मुख्यमंत्री झाल्यानंतर मी आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दुष्काळी भागात पाणी वळवण्याचा पहिला निर्णय घेतला. सिंचनाचे १२० प्रकल्प मार्गी लावले. १५ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणली. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना तत्काळ लाभ दिले जातील. आम्ही पोकळ घोषणा करत नाही. जे बोलतो ते करून दाखवतो. एक रुपयात पीक विमा योजना देणारे आपले पहिले राज्य आहे. महिला सक्षमीकरण करताना मुलींच्या बँक खात्यात एक लाख रुपये जमा करण्याचा निर्णय घेतला.’

CM Eknath Shinde
Loksabha Election : लोकसभेसाठी उदयनराजेंना BJP कडून तिकीट मिळणार की नाही? चित्रा वाघ यांनी मनातलं स्पष्टच बोलून दाखवलं..

मी ‘कॉमन मॅन’

एकनाथ शिंदे म्हणाले, ‘बाळासाहेबांचे विचार, आचार आणि भूमिका घेऊन आम्ही सरकार स्थापन केले. जनतेच्या भल्याचे निर्णय घेतले. पूर्वी राज्यात उद्योग आला की त्यात आपला वाटा किती हे विचारले जायचे. त्यामुळे उद्योगपतींनी पाठ फिरवली. मी सामान्य कुटुंबातील शेतकऱ्याचा मुलगा. मी मुख्यमंत्री झालो. लोकांचे प्रश्न ऐकून घेतो. महाराष्ट्र माझे कुटुंब आहे. मुख्यमंत्री म्हणजे सीएम असे न मानता मी ‘कॉमन मॅन’ म्हणून काम करतो, हीच विरोधकांची पोटदुखी आहे, त्यांना पोटशूळ उठला आहे.’

ते म्हणाले, ‘जे सत्तर वर्षांत झाले नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० वर्षांत केले. २५ कोटी लोकांना दारिद्र्यरेषेच्या वर काढले. ८० कोटी लोकांना मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला. हे देणारे सरकार आहे. दावोसला जाऊन ५ लाख कोटींचे औद्योगिक करार केले. आम्ही उद्योगपतींच्या घराखाली बॉम्ब न ठेवता त्यांना विश्वास दिला. त्यामुळे राज्यात उद्योगांची संख्या वाढली. येत्या काळात ३ लाख कोटी लोकांना रोजगार मिळणार आहे. खासदार धैर्यशील माने यांनी केलेल्या कामाची पोचपावती त्यांना द्याल, असा विश्वास आहे.’

CM Eknath Shinde
Satej Patil : लोकसभेच्या तोंडावर आमदार सतेज पाटलांनी घेतली स्वाती कोरींची भेट; राजकीय चर्चांना उधाण

खासदार धैर्यशील माने म्हणाले, ‘मुख्यमंत्री सामान्य माणसाला मागेल ते देत आहेत. अधिकारी लोकांच्या दारात जाऊन योजनांचा लाभ मिळवून देत आहेत, हे पहिल्यांदा घडते आहे. शिवछत्रपतींच्या स्वप्नातील संकल्पना राबवली जात आहे.’ पालकमंत्री सुरेश खाडे यांनी प्रास्ताविक केले.

धरणग्रस्तांसाठी बैठक

खासदार माने आणि गौरव नायकवडी यांनी वारणा धरणग्रस्तांना न्याय मिळवून देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली. तत्काळ बैठकीचे आश्‍वासन मिळाले.

डांगेंची हजेरी

मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना माजी मंत्री अण्णासाहेब डांगे व्यासपीठावर आले. त्यांच्या उपस्थितीने अनेकांच्या भुवया उंचावल्या. डांगे यांचे दोन्ही सुपुत्र जयंत पाटील गटात कार्यरत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com