
कडेगाव : शिरसगाव (ता. कडेगाव) येथील गायरान जमिनीत उषोषण करणारे माजी सरपंच संभाजी मांडके यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनद्वारे संवाद साधला. येथील उपोषणकर्ते आणि ग्रामस्थ यांच्या मागण्यांबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे आश्वासनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.