

Sharad Lad asserts that the Chief Minister personally promised him candidature for the graduates’ constituency.
Sakal
सांगली: ‘‘पुणे पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा पारंपरिक आहे. ही जागा भाजपच लढवेल आणि ‘शरद लाड, तुम्ही उमेदवार असाल,’ असा शब्द स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला दिला आहे. त्यामुळे महायुतीतील सर्व पक्षांनी वादापेक्षा यश कसे मिळेल, याचा विचार केला पाहिजे,’’ अशी भूमिका क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी ‘सकाळ’शी बोलताना मांडली.