मुख्यमंत्र्यांचा 'सेल्फी वुईथ बंधारा'...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

पोलिसांनी गणशोत्सव मंडळांना आवाहन करून डॉल्बी मुक्त उत्सव केला शिल्लक रक्कम मंडळांनी पोलिसांकडे जमा केली. त्यातून हा बंधारा साकारला. त्यात म्हैसाळ योजनेतून कृष्णा नदीचे पाणी सोडण्यात आले आहे

सांगली - पोलिसांनी डॉल्बी मुक्त योजनेतून बांधलेला बंधारा कालव्याच्या पाण्याने ओसंडून वाहताना पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही . त्यांना जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या सह छायाचित्र घेतले . हा बंधारा साकारण्यात शिंदे यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. 

मिरज शहराच्या पूर्वेला १0 किमी अंतरावर मल्लेवाडी गावातील रामनगर येथे हा बंधारा बांधला आहे . पोलिसांनी गणशोत्सव मंडळांना आवाहन करून डॉल्बी मुक्त उत्सव केला शिल्लक रक्कम मंडळांनी पोलिसांकडे जमा केली. त्यातून हा बंधारा साकारला. त्यात म्हैसाळ योजनेतून कृष्णा नदीचे पाणी सोडण्यात आले आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM takes a selfie