सांगली - चोवीस तास वर्दळ असणाऱ्या स्टँड ते सिव्हिल रस्त्यावर आज सकाळी महाविद्यालयात दुचाकीवरून निघालेल्या तरुणीला भरधाव एसटीने चिरडले. तिच्या डोक्यावरून एसटीचे चाक गेल्याने जागीच मृत्यू झाला..शर्वरी राजकुमार कुलकर्णी (वय-२१, रा. कबाडे हॉस्पिटलच्या पाठीमागे, भारतनगर, कोल्हापूर रस्ता, सांगली) असे तिचे नाव आहे. सकाळी अकराच्या सुमारास जय मातृभूमी व्यायाम मंडळानजीक हा अपघात झाला..दरम्यान, याबाबत सोनाली राजकुमार कुलकर्णी (वय-२६) यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एसटीचालक नितीन श्रीरंग शिंदे (रा. खंडोबाची वाडी, पोस्ट गोवे, जि. सातारा) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तीन दिवसांत सलग झालेल्या अपघातांत चौघांचा मृत्यू झाला. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळळी होती. रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची मोठी गर्दी झाली होती..पोलिस आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, शर्वरी कुलकर्णी ही तरुणी शहरातील एका महाविद्यालयात शिकत होती. आज नेहमीप्रमाणे सकाळच्या सुमारास ती दुचाकीवरून (एमएच १० सीजे २४५७) घरातून निघाली होती..बसस्थानकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्याने शासकीय रुग्णालय चौकाच्या दिशेने येत होती. नेमक्या त्याच वेळी बसस्थानकातून निघालेली जमखंडी मुंबई ही एसटी (एमएच १४ एलएक्स ५९२८) देखील त्याच मार्गाने जात होती. जय मातृभूमी व्यायाम मंडळाच्या नजीक एसटीचालकाने मृत शर्वरी कुलकर्णी हिच्या दुचाकीस ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला..त्यावेळी वेगात असलेल्या एसटीची दुचाकीस धडक बसली. यामुळे शर्वरी रस्त्यावर पडून एसटीच्या चाकाखाली आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दरम्यान, रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी आरडाओरडा केल्याने काही अंतरावर जाऊन एसटीचालकाने एसटी थांबविली आणि घटनास्थळावरून पलायन केले..दरम्यान, नागरिकांनी तातडीने पोलिस ठाण्यास अपघाताची माहिती दिली. क्षणात पोलिस घटनास्थळी आले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह शासकीय रुग्णालयास आणला. अपघात झाल्याचे समजताच रस्त्यावर बघ्यांनी गर्दी केली होती. परिणामी वाहतूक विस्कळीत झाली होती. दोन तास वाहतूक ठप्प होती..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.