esakal | या चिमन्यांनो परत फिरा रे!
sakal

बोलून बातमी शोधा

Come back, these chimneys!

लॉकडाउन जाहीर झाल्यापासून शहरातील वाहनांची वर्दळ थांबली आहे. त्यामुळे ध्वनी प्रदुषण व वायू प्रदुषण कमी झाले. शहराच्या गोंगाटापासून दूर गेलेले पक्षी आता शहरातील उद्यानांच्या दिशेने परतू लागले आहेत.

या चिमन्यांनो परत फिरा रे!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर : लॉकडाउन जाहीर झाल्यापासून शहरातील वाहनांची वर्दळ थांबली आहे. त्यामुळे ध्वनी प्रदुषण व वायू प्रदुषण कमी झाले. शहराच्या गोंगाटापासून दूर गेलेले पक्षी आता शहरातील उद्यानांच्या दिशेने परतू लागले आहेत. हे पाहून नगर महापालिकेचे उद्यान विभाग प्रमुख शशिकांत नजान, आरोग्य अधिकारी डॉ. नरसिंह पैठणकर व महापालिकेचे कर्मचारी यांनी स्वखर्चाने शहरातील उद्यानांत पक्षांच्या अन्न व पाण्याची सोय केली आहे. लॉकडाउनच्या काळात शहरातील उद्यानांत पक्षांना घरटे बांधून विसावा घेता येणार आहे.

लॉकडाउन सुरू झाल्यानंतर देशातील नागरिकांचे रोजगार बंद झाले. हातावर पोट असलेल्या कामगारांच्या घरातील होता तो किराणाही काही दिवसांनी संपला. काही नागरिकांना उपाशी राहण्याची वेळ आली. हे पाहून नगर महापालिकेने किराणा किट व नंतर "कम्युनिटी किचन' उपक्रमाच्या माध्यमातून मोफत जेवणाचे पॅकेट देण्यास सुरवात केली. 

ऐन उन्हाळा व लॉकडाउनमुळे शहरातील वरदळ थांबल्याने पक्षी अन्नाच्या व वृक्षांच्या सावलीच्या अपेक्षेने महापालिकेच्या उद्यानांत आश्रयाला येऊ लागले आहेत. महापालिकेने लॉकडाउनपासून सर्व उद्याने नागरिकांसाठी बंद ठेवलेले आहेत. त्यामुळे निर्मनुष्य उद्यानांत पक्षांचा किलबिलाट ऐकू येऊ लागला आहे. महापालिकेने माणसांच्या जेवणाची सोय केली असली तरी पक्षांच्या उदर निर्वाहाचा प्रश्‍न येऊ लागला आहे.

उन्हाळा असल्याने या पक्षांना अन्न व पाण्याची कमतरता भासू लागल्याचे लक्षात येताच शशिकांत नजान, डॉ. नरसिंह पैठणकर, सूर्यभान देवघडे, विजय कुलाळ, गणेश दाणे, स्वच्छता निरीक्षक राजेंद्र सामल, तुकाराम भांगरे आदींनी स्वखर्चातून पक्षांच्या अन्न व पाण्यासाठीची 60 भांडी विकत घेतली. ही भांडी महापालिकेच्या शहरातील सर्व उद्यानांत ठेवण्यात येणार आहेत. शिवाय पक्षांच्या जेवणासाठी धान्यांची व्यवस्थाही केली आहे. 


शहरातील महापालिकेच्या उद्यानांत पक्षी वाढू लागले आहेत. यात निरनिराळ्या जाती व प्रकारातील हे रंगीबेरंगी पक्षी मनाला भूरळ घालत आहेत. हे पक्षी महापालिकेच्या उद्यानांत रहावे म्हणून या पक्षांना अन्न व पाणी मिळेल अशी भांडी बसविण्यात येत आहेत. 
- शशिकांत नजान, उद्यान विभाग प्रमुख, नगर महापालिका. 


उद्यानांची देखभाल सुरू 
महापालिकेच्या उद्यान विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना त्यांना नियुक्‍त करण्यात आलेल्या उद्यानांची देखभाल करण्याच्या सूचना आज देण्यात आल्या आहेत. त्यानुसार शहरातील उद्यानांची साफ सफाई, वृक्षांना पाणी देणे आदी कामे महापालिका कर्मचारी करणार आहेत.

loading image
go to top