शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शेतमाल तारण ठेव योजनेची सुरवात

नागेश गायकवाड
गुरुवार, 21 जून 2018

घसरत्या भावामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकार आणि पणन मंडळ यांनी राज्यभर शेतमाल तारण ठेव योजना सुरू केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना भाव कोसळल्यावर विक्री करण्याऐवजी माल तारण ठेवून कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध होणार आहे. ही योजना राज्यातील सर्व बाजार समितीत लागू केली आहे.

आटपाडी- घसरत्या भावामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकार आणि पणन मंडळ यांनी राज्यभर शेतमाल तारण ठेव योजना सुरू केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना भाव कोसळल्यावर विक्री करण्याऐवजी माल तारण ठेवून कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध होणार आहे. ही योजना राज्यातील सर्व बाजार समितीत लागू केली आहे.

शेतकऱ्यांना शेतमालाचे दर कोसळल्यावर अडचणीमुळे कमी दरात माल विकावा लागत होता. यामुळे, शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. ते टाळण्यासाठी शासनाने तारण ठेव योजना जाहीर केली आहे. 

एकूण बाजार समिती-304. 
मिळणारे कर्ज किंमतीच्या 75%.
बेदाणा प्रति किलो-75 रू.
व्याजदर-6%.
कालावधी-6 महिने.
गोडाऊन भाडे- 0.

योजनेतील शेतमाल मुग, उडीद, सोयाबीन, भात, तुर, सूर्यफूल, करडई, ज्वारी, बाजरी, मका, गहू, हरभरा, हळद.

मालाचे भाव कोसळल्यावर होणारे नुकसान टाळण्यासाठी चांगली शेतमाल तारण ठेव योजना सूरू केली आहे. नुकताच हा निर्णय झाला, असे यावेळी आटपाडी बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब गायकवाड यांनी सांगितले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Commodity Deposit Scheme to prevent loss of farmers