समन्वय, सुसंवादातून थांबतील डॉक्‍टरांवरील हल्ले - उज्वल निकम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

सोलापूर : फॅमिली डॉक्‍टर ही पध्दत नाहीशी होत आहे. सेवा आणि व्यवसाय याची सांगड घातली जात आहे म्हणूनच डॉक्‍टर आणि रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये वाद होऊन हल्ल्यांचे प्रमाण वाढत आहे. हे रोखण्यासाठी रुग्ण आणि डॉक्‍टरांमध्ये सुसंवादाची आवश्‍यकता असल्याचे मत विशेष सरकारी वकील, पद्मश्री उज्वल निकम यांनी रविवारी सोलापुरात मांडले. 

सोलापूर : फॅमिली डॉक्‍टर ही पध्दत नाहीशी होत आहे. सेवा आणि व्यवसाय याची सांगड घातली जात आहे म्हणूनच डॉक्‍टर आणि रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये वाद होऊन हल्ल्यांचे प्रमाण वाढत आहे. हे रोखण्यासाठी रुग्ण आणि डॉक्‍टरांमध्ये सुसंवादाची आवश्‍यकता असल्याचे मत विशेष सरकारी वकील, पद्मश्री उज्वल निकम यांनी रविवारी सोलापुरात मांडले. 

महाराष्ट्र राज्य आणि सोलापूर स्त्रीरोग व प्रसुतिशास्त्र संघटना, अखिल भारतीय न्यायवैद्यकशास्त्र आणि सोलापूर खाजगी वैद्यकीय रुग्णालय संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल बालाजी सरोवर येथे डॉक्‍टर आणि कायदा याविषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ऍड. निकम यांनी डॉक्‍टरांवरील हल्ले रोखण्यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात यावर सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी मंचावर अखिल भारतीय स्त्रीरोग संघटनेचे अध्यक्ष डॉ. एम.सी पटेल, महाराष्ट्र स्त्रीरोग व प्रसुतिशास्त्र संघटनेच्या अध्यक्षा डॉ. रोहिणी देशपांडे, सोलापूर स्त्रीरोग व प्रसुतिशास्त्र संघटनेच्या अध्यक्षा डॉ. माधुरी दबडे, प्रादेशिक समन्वयक डॉ. माणिक गुर्रम, डॉ. राजीव दबडे, अखिल भारतीय न्यायवैद्यकशास्त्र संघटनेच्या अध्यक्षा डॉ.अलका कुथे, डॉ. यजुर्वेदी, डॉ. संध्या क्षृंगारपुरे, डॉ. प्रतिभा बलदवा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 

डॉक्‍टरांकडून पेशंटची हेळसांड होणे, योग्य उपचार न होणे, रुग्णालयात सुविधांचा अभाव असणे, औषधांचा भडीमार, बिलासंदर्भातच्या तक्रारी आणि उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू अशा कारणामुळे डॉक्‍टरांवर रुग्णाच्या नातेवाईकांकडून हल्ले होतात असे सांगून ऍड. निकम म्हणाले, रुग्णालयांमध्ये सुसंस्कृत आणि सुशिक्षित कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी. त्यांना योग्य प्रशिक्षण द्यावे. रुग्णालयाच्या परिसरात सुरक्षा रक्षक तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवले पाहिजेत. रुग्णालयात येणाऱ्या-जणाऱ्यांची प्रत्येकाची नोंद घेतली पाहिजे. अतिदक्षता विभागात वाद होण्याचे प्रमाण अधिक आहे, त्यावरही योग्य त्या उपाययोजना केल्या पाहिजे. रुग्णालयात समन्वयासाठी योग्य व्यक्तीची नियुक्ती करणे आवश्‍यक आहे. सोशल मिडियाबाबतही डॉक्‍टरांनी सतर्क असायला हवे. 

डॉ. माधुरी दबडे यांनी प्रास्ताविक केले. स्त्रीरोग व प्रसुतिशास्त्र संघटेनच्यावतीने पद्मश्री ऍड. निकम यांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन डॉ. नंदा मगई, डॉ.सुजाता कुलकर्णी, डॉ मोनिका उमरदंड, डॉ. प्रतिभा बलदवा यांनी केले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ विधिज्ञ मिलिंद थोबडे, जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत, डॉ. गिरीष कुमठेकर, डॉ. मिलिंद शहा आदी उपस्थित होते. 

ऍड. उज्वल निकम म्हणाले.. 
- डॉक्‍टरांच्या संरक्षणासाठी कडक कायद्याची तरतूद आवश्‍यक. 
- कायद्याप्रमाणे डॉक्‍टरांनी योग्य त्या उपाययोजना कराव्यात. 
- सामाजिक बांधिलकी जोपासून गरीबांसाठी उपक्रम राबवावेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: communication stops attack on doctors said ujjval nikam