२०१९ मधील वंचित कुटुबियांना मिळणार भरपाई

२०१९ मधील वंचित कुटुबियांना मिळणार भरपाई

४७७ कुटुंबीयांचा समावेश; अर्ज अपलोड करण्याचे निपाणी प्रशासनाला आदेश
Published on

निपाणी : २०१९ मध्ये अतिवृष्टी(heavy rain) व महापुरामुळे(flood) घरांची पडझड होऊनही अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही, अशा वंचित लाभार्थ्यांचे अर्ज आता पुन्हा स्वीकारले जाणार आहेत. खात्याने वंचित लाभार्थ्यांचे अर्ज आॅनलाईन दाखल करण्याचे आदेश येथील तहसील कार्यालयाला दिले आहेत. २०१९ मधील अतिवृष्टी व महापुरामुळे घरांची पडझड होऊनही भरपाई न मिळालेल्या निपाणी तालुक्यातील कुटुंबांची संख्या ४७७ असल्याची माहिती प्रशासनाने दिली. जिल्ह्यात वंचित कुटुंबीयांची संख्या ६ हजारवर आहे.

सन २००५ नंतर २०१९ मध्ये अतिवृष्टी व महापुराचा फटका तालुक्यातील गावांना बसला. प्रामुख्याने नदीकाठावरील गावांचे न भरून येणारे नुकसान झाले. घरांच्या पडझडीसह शेतीचे नुकसान झाले. यावेळी शासन, प्रशासनाने भरपाईची ग्वाही दिली. घरांची भरपाई देताना ए, बी, सी अशी वर्गवारी करून पंचनामे करण्यात आले. त्यानुसार २५ हजारापासून ५ लाख रुपयापर्यंतची भरपाई हजारो लाभार्थ्यांना मिळाली. मात्र काही गावातील कुटुंबीयांनी कागदपत्रांसह घरांच्या पडझडीचा अर्ज वेळेत दाखल न केल्याने अशा घरांची आॅनलाईन नोंदणी होऊ शकली नाही. काही अर्जांची मंजूरी रखडली.

२०१९ मधील वंचित कुटुबियांना मिळणार भरपाई
पुणे : विकासाला मिळणार हायस्पीडची जोड

त्यानंतर अर्ज करण्याची वेबसाईट बंद झाल्याने असंख्य कुटुंबीयांना अर्ज करता आला नाही. परिणामी भरपाईपासून या कुटुंबांना वंचित रहावे लागले. काही गावातील पूरग्रस्तांनी प्रशासनाकडून झालेल्या पंचनाम्यावर आक्षेप घेतला. तर काही गावातील पूरग्रस्तांनी पत्र, निवेदनासह तहसील कार्यालयासमोर आंदोलने केली. प्रशासनाच्या निषेधार्थ ठिय्या मारला. यामुळे हा विषय पूरग्रस्तांच्या जिव्हाळ्याचा बनला होता. दरम्यान काही गावात पन्हा पंचनामे करावे लागले होते.

एकूणच पूरग्रस्तांच्या तक्रारी, कागदपत्रांची जमवा-जमव, अपुरी कागदपत्रे, स्थानिक पातळीवरील अडचणी अशा अनेक कारणांनी अर्ज करण्याची प्रक्रीया रखडली. त्यानंतर आॅनलाईन अर्ज करण्याची साईट बंद झाल्याने पूरग्रस्तांना तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागले. त्यानंतर पूरग्रस्तांना केवळ भरपाईची आशा लागून राहिली होती. आता खात्याने वंचित कुटुबीयांचे अर्ज दाखल करून घेण्यास सांगितल्याने पूरग्रस्तांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. सध्या बोरगाव नगर पंचायत निवडणूक सुरु असल्याने कर्मचारी कामात व्यस्त आहेत. लवकरच वंचित कुटुंबीयांचे अर्ज अपलोड केले जाणार असल्याचे अधिकारयांनी सांगितले.

२०१९ मधील वंचित कुटुबियांना मिळणार भरपाई
Maharashtra Budget 2021: रिंग रोड, पुणे-नाशिक लोहमार्गामुळे पुण्याच्या विकासाला चालना मिळणार

२०१९ मधील महापुराने घरांची पडझड होऊनही अद्याप ज्यांना भरपाई मिळालेली नाही, अशा कुटुंबीयांचे अर्ज अपलोड करण्यास सांगितले आहेत. जवळपास ४७७ वंचित लाभार्थी असल्याची माहिती कार्यालयाकडे आहे. लवकरच अर्ज अपलोड करून मंजूरीसाठी पाठविले जातील.

-डाॅ. मोहन भस्मे,

तहसीलदार, निपाणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com