"नरेंद्र मोदी' पुस्तकप्रकरणी गुन्हा दाखल करा; सोलापूर पोलिसांकडे तक्रार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जानेवारी 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करण्यात आली आहे. यामुळे शिवप्रेमी व शिवभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या पुस्तकामुळे मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे, असे दिनकर जगदाळे यांच्या फिर्यादीत म्हटले आहे.

सोलापूर : "आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून सामाजिक भावना दुखावल्याप्रकरणी सोलापुरातील फौजदार चावडी पोलिस ठाण्यात लेखकाविरुद्ध पहिला गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दाखल झाली आहे.

शिवप्रेमींच्या भावना दुखावल्याची तक्रार
दिनकर नागनाथ जगदाळे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात जय भगवान गोयल यांनी लिहिलेल्या "आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले होते. या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एकेरी शब्दांत उल्लेख करण्यात आला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करण्यात आली आहे. यामुळे शिवप्रेमी व शिवभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या पुस्तकामुळे मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे, असे जगदाळे यांच्या फिर्यादीत म्हटले आहे.

चौकशी सुरू असल्याचे पोलिसांचा दुजोरा
जगदाळे यांची तक्रार दाखल झाली असून, यासंदर्भात चौकशी सुरू असल्याचे फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय साळुंखे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Complaint to Solapur Police about Aaj ke Shivaji Narendra Modi book