गटार बांधकाम पूर्ण करा, अन्यथा पलूस पालिकेसमोर आंदोलन

संजय गणेशकर
Wednesday, 20 January 2021

पलूस : येथील प्रभाग क्रमांक 5 मधील नंदीवाले समाज गल्लीतील गटार बांधकाम बरेच दिवस रखडले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. रखडलेल्या गटारीचे बांधकाम त्वरित पूर्ण करावे. अन्यथा पलूस नगरपालिकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला. 

यावेळी क्रांती सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिगंबर पाटील यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आनंदराव निकम, राहुल जगताप, किशोर माळी, ऋषीकेश पाटील, नागरिक व महिला उपस्थित होत्या. 
पलूस येथील प्रभाग क्रमांक5 मध्ये जाऊन दिगंबर पाटील यांनी अर्धवट गटार कामाची पाहणी केली. पालिकेने 12 लाख रुपये खर्चाचे हे गटार बांधकाम सुरू केले. मात्र, 68 मीटरपर्यंत काम पूर्ण झाले आहे. उर्वरित 161 मीटर गटारीचे काम अनेक दिवसांपासून रखडले आहे. अर्धवट गटार कामामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. लहान-मोठे अपघातही होत आहेत. 

याबाबत येथील नंदीवाले समाजातील नागरिकांनी नगरपालिका व संबंधित नगरसेवकांना यापूर्वी निवेदने दिली आहेत, तरीही दुर्लक्ष असल्याच्या तक्रारी पत्रकारांसमोर मांडण्यात आल्या. पालिकेला दिलेल्या निवेदनावर महेश मोकाशी, मोहन मोकाशी, मनोज मोकाशी, एकनाथ मोकाशी, विनोद मोकाशी, संदिप जाधव,अनिल जाधव आदींच्या सह्या आहेत.

संपादन : प्रफुल्ल सुतार 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Complete the gutter construction, otherwise agitation