नक्‍की वाचाच..सोलापुरात देशव्यापी संपाला संमिश्र प्रतिसाद 

national strike
national strike
Updated on

सोलापूर : जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह अन्य 23 मागण्यांसाठी बुधवारी (ता. 8) आयोजित देशव्यापी संपाला सोलापुरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. सर्व शासकीय विभागांमधील सुमारे आठ हजार कर्मचारी संपात सहभागी झाल्याचे कामगार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंतनू गायकवाड यांनी सांगितले. दरम्यान, माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखालील सोलापुरातील गुरुनानक चौकासह इतरत्र रास्ता रोको आंदोलन करताना दोन हजार 250 आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 

देशव्यापी संपात जिल्ह्यातील आशा वर्कर्स, बाल कामगार प्रकल्प, महसूल, कोतवाल कर्मचारी, अंगणवाडी सेविका, सार्वजनिक बांधकाम, सिव्हिल हॉस्पिटल युनियन, जुनी पेन्शन हक्‍क संघटना, पोस्टल एम्पलॉईज्‌ युनियन, ग्रामीण डाक सेवक, रेल माथाडी क्रॉन्ट्रॅक्‍ट युनियन, कॅनरा बॅंक, बॅंक एम्लॉइज्‌ युनियन, मुद्रांक व नोंदणी, परिचारिका संघटना, सहकार, समाजकल्याण, विमा कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला. मात्र, या वेळी काही विभागाचे प्रतिनिधीच हजर असल्याचीही चर्चा होती. खासगीकरण रद्द करा, जुनी पेन्शन मिळालीच पाहीजे, किमान वेतन 21 हजार रुपये दिलेच पाहीजे, बॅंकांचे विलीनीकरण थांबवा, शासकीय रिक्‍त जागांची नोकरी भरती करा, शेतमालाला हमीभाव द्या अशा घोषणा देण्यात आल्या. 

ठळक बाबी... 

  • शहर-जिल्ह्यातील 29 संघटनांनी नोंदविला देशव्यापी संपात सहभाग 
  • संपात विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचीच गर्दी : नोकदार मात्र कामावरच 
  • माजी आमदार आडम मास्तरांच्या रास्ता रोकोवेळी पोलिसांनी दोन हजार जणांना घेतले ताब्यात 
  • सोलापूर महापालिकेसमोर दिव्यांग कर्मचाऱ्यांनी मारला होता सकाळपासूनच ठिय्या 
  • आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविकांची लक्षणीय उपस्थिती : जिल्हा परिषदेसमोर मोर्चा 
  • शासकीय कामकाज, आरोग्य सेवा अन्‌ वाहतूक व्यवस्था सुरळीत : रेल्वे माथाडी कामगारांचाही संपात सहभाग 
  • भूमी अभिलेख, महसूल, सहकार, राज्य विमा कामगार रुग्णालयातील कर्मचारी 100 टक्‍के सहभागी 
  • सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मदतनीस म्हणून 150 होमगार्ड यांची नियुक्‍ती 
     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com