आरोग्य खात्यामध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरीची सक्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

biometric attendance

बेळगाव : आरोग्य खात्यामध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरीची सक्ती

बेळगाव : आरोग्य खात्यामध्ये यापुढे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरीची सक्ती केली जाणार आहे. या हजेरीच्या आधारावरच कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार असून ८० टक्केपेक्षा कमी हजेरी असल्यास वेतन कपात केली जाणार आहे.

कोरोणा संसर्गामुळे मागील दोन वर्षापासून बायोमेट्रिक हजेरीची पद्धत बंद करण्यात आली होती. त्यामुळे काही कर्मचारी आणि अधिकारी सेवेवर गैरहजर राहत असल्याचे दिसून आल्याने पुन्हा बायोमेट्रिक सक्तीची केले जात आहे. आरोग्य खात्याच्या अखत्यारीत येणारे सर्व कार्यालय,‌ रुग्णालय आणि संस्थामध्ये डॉक्टर्स, परिचारिका, कर्मचारी, अधिकारी या सर्वांना बायोमेट्रिक हजेरी सक्तीची असणार आहे. ८० टक्क्यांपेक्षा कमी हजेरी असल्यास संबंधित कर्मचाऱ्यांची वेतन कपात केली जाणार असून त्याला कारणे दाखवा नोटीस देखिल बजावली जाणार आहे.

कर्मचाऱ्यांना दिवसातून तीन वेळा आपली हजेरी देणे बंधनकारक असणार आहे. कार्यालयीन कर्मचाऱ्यांना सकाळी दहा, दुपारी एक वाजता आणि सायंकाळी साडेपाच वाजता हजेरी द्यावी लागेल. तर रुग्णालयात काम करणारे डॉक्टर परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांना सकाळी नऊ, दुपारी एक आणि सायंकाळी साडेचार वाजता हजेरी द्यावी लागणार आहेत. तर रुग्णालयात शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांना देखील त्यांच्या आठ तासाच्या सेवेनुसार तीन वेळा हजेरी द्यावी लागणार आहे. आरोग्य खात्याकडून याबाबतचे आदेश बजावण्यात आले आहेत.

Web Title: Compulsory Biometric Attendance Officers Staff Health Department Salary Deduction Attendance Less

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top