esakal | कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी आरटी-पीसीआर रिपोर्टची सक्ती कायम
sakal

बोलून बातमी शोधा

कर्नाटक प्रवेश

कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी आरटी-पीसीआर रिपोर्टची सक्ती कायम

sakal_logo
By
अनिल पाटील : सकाळ वृत्तसेवा

कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावरून कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी आरटी-पीसीआर रिपोर्टची सक्ती कायम ठेवली आहे. बेळगावचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी शासनाकडे आरटी-पीसीआर रिपोर्टची सक्ती कमी करावी, असा प्रस्ताव दिला आहे. पण सोशल मीडियावर रिपोर्टची सक्ती बंद केल्याचे संदेश व्हायरल झाले आहेत. त्यामुळे आरटी-पीसीआर रिपोर्ट व सीमा तपासणी नाका बंद होणार का, अशी शंका निर्माण झाली होती. पण जिल्हाधिकाऱयांशी संपर्क साधला असता आपण आरटी-पीसीआर रिपोर्ट न पाहता दोन कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या प्रवाशांना सोडावे, असा प्रस्ताव सरकारकडे दिला असल्याचे सांगितले. येथे बंदोबस्त कडकच असून वाहनांचीही तपासणी करण्यात येत आहे.

हेही वाचा: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकर?

कोगनोळी येथे दूधगंगा नदीवर असणाऱ्या कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर महाराष्ट्र व इतर राज्यातून येणाऱ्या प्रवाशांचे आरटी-पीसीआर रिपोर्ट तपासणी केली जात आहे. या सीमा तपासणी नाक्यावर कर्नाटकालगत असणाऱ्या महाराष्ट्रातील गावांना जाण्यासाठी विना थांबा बससेवा सुरू झाली आहे. तसेच कर्नाटकातील सीमा भागातील कामगारांना महाराष्ट्रातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत, गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत, शिरोली औद्योगिक वसाहतीस सोडले जात आहे. कोल्हापूर व इतर शहरात कामावर जाणाऱ्या कामगारांनाही या ठिकाणाहून सोडले जात आहे. सीमा नाक्यालगत असणाऱ्या गावातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बसेस सुरु झाल्या आहेत. त्यामुळे काही अंशी दिलासा मिळाला आहे. सीमा तपासणी नाक्यावरुन कर्नाटकात प्रवेशासाठी आरटी-पीसीआर रिपोर्टची तपासणी केली जात आहे.

loading image
go to top