सांगली जिल्ह्यात 70 हजारवर नागरिकांनी घेतली कोरोना लस

condition of covid 19 in sangli available bed and vaccine updates
condition of covid 19 in sangli available bed and vaccine updates
Updated on

सांगली : कोरोना वाढता संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाकडून सर्वोतपरी प्रयत्न केले जात आहे. लसीकरण मोहीमेस जिल्ह्यात प्रारंभ झाला असून कालपर्यंत सुमारेस 70 हजार 862 नागरिकांनी लस घेतली. दुसऱ्या बाजूल मिरजेतील कोरोना रुग्णालयात 380 बेड असून त्यापैकी तीनशेवर खाटा रिकाम्या आहेत. कोरोना लस अत्यंत सुरक्षित असून ती नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी 'सकाळ'शी बोलतांना दिली. 

जिल्ह्यात अत्तापर्यंत 70 हजार 862 जणांनी लस घेतली आहे. त्यापैकी 30 हजार 459 आरोग्य कर्मचारी आहेत. अत्यावश्‍यक सेवेतील 9 हजार 993 जणांनी लस घेतली. तसेच 25 हजार 810 ज्येष्ठ, तर 4600 व्याधीग्रस्त नागरिकांनी लस घेतली. 

महापालिका क्षेत्रातही लसकरण मोहीमेस प्रतिसाद मिळत आहे. 9070 आरोग्य कर्मचारी, 4029 अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचारी, 7860 ज्येष्ठ, तर 1178 व्याधीग्रस्त नागरिकांनी लस घेतली. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. नागरिकांनी घाबरून जावू नये. कोरोना नियमांचे पालन कारवे, असे आवाहन डॉ. साळुंखे यांनी केले आहे. मिरजेतील कोरोना रुग्णालयात तीनशेहुन अधिक बेड रिकामे आहेत. प्रशासनाकडून सर्व तयारी ठेवण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com