माणगंगा नदीवरील रुंद पुलाची अवस्था 'अरुंद'

The condition of the wide bridge over the river Manganga is narrow
The condition of the wide bridge over the river Manganga is narrow

दिघंची : दिघंची येथील मल्हारपेठ पंढरपूर रोडवर व मानगंगा नदीवरील पुलाची दुरवस्था झाली आहे. कठडे तुटले आहेत. राज्यमार्ग झाला. रुंद पुलाची अवस्था अरुंद अशी आहे. हा पूल धोकायदाय बनला असून या फुलाची स्ट्रक्‍चरल ऑडिट करावे व पर्यायी पूल बांधण्यात यावा, अशी मागणी सरपंच अमोल मोरे यांनी केली आहे. 

गेल्या शतकामध्ये दिघंची वरून पंढरपूरला जाण्यासाठी माणगंगानदी पार करावी लागत होती. यासाठी लोखंडी काईलचा वापर केला जातो. यामध्ये ग्रामस्थ बसायचे इकडून तिकडे नदीपार करायची व नदीपात्र पाण्याने पूर्णपणे भरल्याने पंढरपूरहून आलेली एसटी बस नदीपलीकडे थांबायची व कऱ्हाडहून आलेली एसटी बस नदीकाठच्या अलीकडे थांबायची. बसमधील प्रवासी काईलीद्वारे पलीकडे जात होत अशी व्यवस्था होती. 

दरम्यान, मल्हार पेठ पंढरपूर या राज्यमार्गावर व दिघंची माणगंगा नदी वर 1974 मध्ये 22 लाख रुपये खर्चून पूल बांधण्यात आला. त्यावेळी पुलावरील रहदारी कमी होती. सध्या या पुलाची दुरवस्था होऊन कठडे तुटले आहेत. तरी संबंधित धोका लक्षात घेऊन संबंधित विभागाने या पुलाचे ऑडिट करावे. या पुलाला पर्यायी पूल उभा करावा, अशी मागणी केली जात आहे.

मल्हारपेठ पंढरपूर या राज्य मार्गावर व नदीच्या पुलावर दोन्ही बाजूनी सध्या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले आहे, मात्र या ठिकाणी असणारा पूल अरुंद आहे. सध्या या पुलावरून वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 

पुलाची वैशिष्ट्ये 
-पाणलोट क्षेत्र 570 मैल 
-एकूण गाळे 7×60 
-काम सुरू 18 डिसेंबर 1974 
-काम पूर्ण 31 ऑक्‍टोबर 1979 
-एकूण खर्च 22 लाख 42 हजार 

लवकरच या पुलाचे स्ट्रक्‍चरल ऑडिट व्हावे व पर्यायी पूल बांधण्यात यावा यासाठी युवा नेते तानाजीराव पाटील व आमदार अनिल भाऊ बाबर यांच्याकडे पाठपुरावा करणार. 
- अमोल मोरे, सरपंच दिघंची

संपादन : प्रफुल्ल सुतार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com