मिरजमध्ये भाजी विक्रेते व प्रशासनातील संघर्ष पुन्हा तीव्र ?

Conflict between vegetable sellers and administration
Conflict between vegetable sellers and administration

मिरज : जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी रस्त्यावर व्यवसाय करण्यास विक्रेत्यांना मनाई केल्यामुळे मिरज शहरातील अनेक मुख्य रस्त्यानी आज मोकळा श्वास घेतला. परंतु यामध्ये किरकोळ भाजी विक्री करणाऱ्या शेतकरी महिलां आणि अन्य विक्रेत्यांचे मात्र प्रचंड हाल झाले. या सर्व विक्रेत्यांनी शहरातील गल्लीबोळात आपल्या पथाऱ्या पसरल्या आहेत.त्यामुळे भाजी विक्रेते आणि प्रशासनातील संघर्ष पुन्हा एकदा तीव्र होण्याची शक्‍यता आहे. 

"जनता कर्फ्यू" ची कडक अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीसांनी रस्त्यावरील विक्रेत्यांना रस्त्यावर बसून व्यवसाय करण्यास आज (सोमवार) पासून मनाई केली. याबाबतचा आदेश पालकमंत्री जयंत पाटील यांनी रविवारी रोजी जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत दिले.त्यानंतर प्रशासनाने पोलिसांना रस्त्यावरील विक्रेत्यांना हटवण्यास सांगितले. पोलीसांनी सोमवारी सकाळी रस्त्यावरील विक्रेत्यांना व्यवसाय करण्यास मनाई केली. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकानेही कारवाईचा इशारा देऊन शहरातील सर्वच रस्त्यावरील विक्रेत्यांना अक्षरशः हुसकावून लावले. 

त्यामुळे लोणी बाजार, किसान चौक यासह शहरातील सर्व प्रमुख चौकांमध्ये रस्त्यावर बसून भाजी तसेच अन्य साहित्यांची विक्री करणऱ्या विक्रेत्यानी पुन्हा एकदा नजीकच्या गल्ली गोळ्यांमध्ये आश्रय घेतला. परंतु तेथेही विक्रेत्यांची स्थानिक नागरिकांशी वादावादी सुरू झाली. बहुसंख्य ठिकाणी स्थानिक नागरिकांनी विक्रेत्यांना आपल्या घरांसमोर व्यवसाय करण्यास विरोध केल्यामुळे विक्रेत्यांची प्रचंड तारांबळ उडाली. 

दो दिन ठैरो:वो मेरेको मालुम नही...
स्वतः ला रस्त्यावरील विक्रेत्यांचा तारणहार समजणाऱ्या महापालिकेतील एका टग्या कारभाऱ्यांने नेहमीप्रमाणे विक्रेत्यांना आपल्या दरबारात बोलावून "दो दिन ठैरो मै साहेबसे बात करता हू" असे सांगुन विक्रेत्यांची बोळवण केली खरी. पण काही विक्रेत्यांनी भाजीमंडईचे काय झाले असे विचारताच या कारभा-याने "वो मेरे को मालूम नाही" असे सांगून हात वर केले.  

संपादन : प्रफुल्ल सुतार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com