Vidhan Sabha 2019 : सायकलवरून जाऊन ऋतुराज पाटलांनी भरला अर्ज

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पाटील यांचे कार्यकर्त्यांना ऐतिहासिक दसरा चौकात बोलवण्यात आले होते. तेथून व्हीनस कॉर्नर असेंबली रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सायकल रॅली काढण्यात आली. त्यात हजारो कार्यकर्ते उत्साहाने सहभागी झाले होते.

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीतील कोल्हापूर दक्षिण मधील काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज संजय पाटील यांनी आज (गुरुवार) जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

पर्यावरण पूरक संदेश देण्यासाठी त्यांनी सायकल रॅलीद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक करण्यात येऊन आपला अर्ज सादर केला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे चुलते व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार पी. एन. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पाटील यांचे कार्यकर्त्यांना ऐतिहासिक दसरा चौकात बोलवण्यात आले होते. तेथून व्हीनस कॉर्नर असेंबली रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सायकल रॅली काढण्यात आली. त्यात हजारो कार्यकर्ते उत्साहाने सहभागी झाले होते. रॅलीत पाटील यांच्या काँग्रेसच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. या घोषणांनी हा मार्ग दणाणून गेला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress candidate Ruturaj Patil submit form for Kolhapur Maharashtra Vidhan Sabha 2019