पहिल्या फेरीत कॉंग्रेस विजयी; दुसऱ्या फेरीत भाजप-अपक्षमध्ये चुरस

पहिल्या फेरीत कॉंग्रेस विजयी; दुसऱ्या फेरीत भाजप-अपक्षमध्ये चुरस
Updated on

चिक्कोडी : बेळगाव विधान परिषद निवडणुकीत काॅंग्रेसचे उमेदवार चन्नराज हट्टीहोळी (Channaraj Hattiholi) हे पहिल्या फेरीतच विजयी झाले. (Belgaum) त्यांच्यापाठोपाठ अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी (Lakhan Jarkiholi) हे आघाडीवर आहेत. सध्या दुसऱ्या पसंतीक्रमाच्या मतांची मोजणी सुरू आहे. दुसऱ्या फेरीत भाजप आणि अपक्ष उमेदवार यांच्यात चुरस पहायला मिळत आहे. (Belgaum Election Result 2021)

पहिल्या फेरीत कॉंग्रेस विजयी; दुसऱ्या फेरीत भाजप-अपक्षमध्ये चुरस
PHOTO - बेळगाव बंद; व्यापाऱ्यांवर कर्नाटक पोलिसांकडून दडपशाही

बेळगाव जिल्ह्यात विधान परिषदेच्या २ जागांसाठी शुक्रवारी (१०) चुरशीने मतदान झाले. सर्व उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाल्यावर आपलाच उमेदवार निवडून येणार, याबाबत अनेक राजकीय जाणकारांनी आकडेमोडीला सुरुवात केली होती. मंगळवारी सकाळी (१४) चिक्कोडीतील आर. डी. महाविद्यालयात मतमोजणीला प्रारंभ झाला आहे. विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात एकूण ६ उमेदवार होते. त्यातील भाजपचे महांतेश कवटगीमठ, काँग्रेसचे चन्नराज हट्टीहोळी व अपक्ष लखन जारकीहोळी यांच्यातच थेट लढत झाली. आपल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी नेते, कार्यकर्ते व समर्थकांनी कंबर कसली होती. त्यात बाजी कोण मारणार, याचा फैसला आज निवडणूक निकालातून कसा लागेल, याची उत्सुकता संपूर्ण जिल्ह्याला होती.

पहिल्या फेरीत कॉंग्रेस विजयी; दुसऱ्या फेरीत भाजप-अपक्षमध्ये चुरस
महाविकास आघाडी सरकार पडेल असं वाटत नाही - राज ठाकरे

पहिल्या फेरीतच काॅंग्रेसचे उमेदवार चन्नराज हट्टीहोळी यांनी बाजी मारली. त्यानंतर अपक्ष उमेदवार लखन जारकिहोळी हे ही आघाडीवर असल्यामुळे नेतेमंडळींसह कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरु केला आहे. फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण सुरु करण्यात आली आहे. महांतेश कवटगीमठ यांचा पराभव झाल्याने भाजपच्या गोटात शांतता पसरल्याचे चित्र दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Miraj Kolhapur Jalna ST bus attack latest news
sparrow chick falls from nest
bribery case in Sangli district
Maharashtra Sugar Market
Marathi News Esakal
www.esakal.com