सांगली: शिराळ्याचे नाईक-देशमुख, विट्याचे पाटील, कवठ्याचे घोरपडे, सांगलीचे पाटील या साऱ्यांना काँग्रेसने बलवान केले. सत्ता असताना ताकद दिली, पदे दिली. काँग्रेसची सत्ता गेली. सत्तेशिवायची अस्वस्थता वाढली. घुसमट जाणवायला लागली. विरोधी बाकावर गेल्यानंतर ‘सत्ता’ हवी वाटू लागली. अंतर्गत लाथाळ्या सुरू झाल्या. हळूहळू करत एकेकाने बुडत्या जहाजातून उडी घेतली. आता काँग्रेस रिकामी व्हायला लागली.