'आरएसएस'च्या संचलनात काँग्रेस नेत्यांची हजेरी

प्रशांत देशपांडे
Tuesday, 8 October 2019

संचलनास विधानसभेची झालर
राजकारणात विविध पदे मिळविण्यासाठी वर्षानुवर्षे संघ अन्‌ भाजपला लक्ष करणाऱ्या नेत्यांचे विचार मात्र, पक्षांतरानंतर लगेचच बदलल्याचे पहायला मिळाले. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात कधीच सहभागी न झालेले राष्ट्रवादीचे उमेदवार तथा सोलापूर महापालिकेचे माजी महापौर मनोहर सपाटे यांनी यंदा आवर्जुन उपस्थिती लावली. संघांच्या स्वयंसेवकांची मते आपल्यालाही मिळावीत असा त्यामागे हेतू असल्याची चर्चा सुरु होती.

सोलापूूर : विजयदशमीनिमीत्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने सोलापूर शहरात विविध ठिकाणी संचलन पार पडले. दरवर्षीच्या तुलनेत यंदाच्या संचलनाचे वैशिष्टे म्हणजे पक्षांतर करण्यापूर्वी आरआरएसवर सडकून टीका करणाऱ्या कॉंग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांसह विधानसभा निवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार मनोहर सपाटे यांनी आवर्जुन उपस्थिती लावली.

सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमदेवार तथा कॉंग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी शिवाजी गटाच्या ओम गर्जना चौकात उभारून संचलनावर पुष्पवृष्टी करीत स्वागत केले. तर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार मनोहर सपाटे यांनी दयानंद गटाचे अवंतीनगर येथे स्वागत केले. तर कॉंग्रेस नेते तथा सध्या शिवसेनेत असलेले महेश कोठे यांनीही संचलनाचे पुष्पवृष्टी करून स्वागत केले. दरम्यान, श्री. सपाटे यांनी यंदा प्रथमच संघाची टोपी परिधान केल्याचे पहायला मिळाले. या संचलनात सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी संघाचा ड्रेस कोड परिधान करत सहभाग नोंदवला.

संचलनास विधानसभेची झालर
राजकारणात विविध पदे मिळविण्यासाठी वर्षानुवर्षे संघ अन्‌ भाजपला लक्ष करणाऱ्या नेत्यांचे विचार मात्र, पक्षांतरानंतर लगेचच बदलल्याचे पहायला मिळाले. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात कधीच सहभागी न झालेले राष्ट्रवादीचे उमेदवार तथा सोलापूर महापालिकेचे माजी महापौर मनोहर सपाटे यांनी यंदा आवर्जुन उपस्थिती लावली. संघांच्या स्वयंसेवकांची मते आपल्यालाही मिळावीत असा त्यामागे हेतू असल्याची चर्चा सुरु होती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress leader participate in RSS rally on Dussehara occasion