सत्तेसाठी काँग्रेसकडे प्रस्ताव आल्यास विचार करू; पृथ्वीराज चव्हाणांकडून दारे खुली

टीम ई-सकाळ
Tuesday, 29 October 2019

कऱ्हाड : शिवसेनेकडून काँग्रेसकडे सरकार स्थापनेसाठी जर, प्रस्ताव आला तर, त्यावर आमच्या श्रेंष्ठींकडे तो प्रस्ताव पाठवन मित्र पक्षाबरोबरही चर्चा करून पुढील निर्णय घेवू, असे मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे व्यक्त केले. मात्र, अद्याप कोणताही प्रस्ताव आला नसल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

कऱ्हाड : शिवसेनेकडून काँग्रेसकडे सरकार स्थापनेसाठी जर, प्रस्ताव आला तर, त्यावर आमच्या श्रेंष्ठींकडे तो प्रस्ताव पाठवन मित्र पक्षाबरोबरही चर्चा करून पुढील निर्णय घेवू, असे मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे व्यक्त केले. मात्र, अद्याप कोणताही प्रस्ताव आला नसल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीत केला 'एवढा' खर्च

'युतीत काही तरी गोंधळ आहे'
महाराष्ट्रामध्ये भाजप-शिवसेनेचे सरकार स्थापण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लवकर सरकार स्थापन करून महाराष्ट्राला स्थिर सरकार द्यावे, असे आवाहन सत्ताधाऱ्यांना करून माजी मुख्यमंत्री आमदार चव्हाण म्हणाले, ‘दोन्ही पक्षांकडून जाहीरपणे जे बोलणे चालू आहे. त्यावरून काहीतरी अडचण निर्माण झाली आहे, असे दिसते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे अध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी बसून जो करार केला होता. त्यामध्ये आमचं ठरलंय असे ते सांगत होते. मात्र, आता मुख्यमंत्री व शिवसेनेकडून काय ठरलंय हे सांगताना विसंगती दिसत आहे. त्यामुळे दोघांपैकी एक कोणीतरी खोटं बोलतंय. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला झुलवत संभ्रमात ठेवण्यापेक्षा दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन काय ठरलंय ते सांगावं. आत्ताच जर एकमेकांबद्दल गैरविश्वास निर्माण झाला तर, हे सरकार कसे स्थापन होईल याबाबत शंका आहे. शिवसेनेकडून आमच्याकडे सरकार स्थापनेसाठी जर प्रस्ताव आला तर त्यावर आवश्यक तो विचार करून आमच्या श्रेष्ठींकडे प्रस्ताव मांडून आमच्या मित्र पक्षाबरोबर चर्चा करुन निर्णय घेवू.’ 

पाडव्याला सजलेल्या म्हशी म्हणाल्या, 'आमचं ठरलंय, गोकुळ उरलंय'

उंडाळकर-चव्हाण भेट
अॅड. उदयसिंह पाटील यांनी मला भेटून माझे अभिनंदन केले, असे सांगून चव्हाण म्हणाले, ‘विलासराव पाटील उंडाळकर हे काँग्रेसचे 35 वर्षे आमदार होते. त्यांच्या वतीने त्यांचे चिरंजीव निवडणुकीत उभे होते. त्यांना पडलेली मते ही काँग्रेसची आहेत. या निवडणुकीत काँग्रेसच्या मतांचे विभाजन झाले. अॅड. उदयसिंह पाटील यांनी मला येऊन भेटून शुभेच्छा दिल्या. काँग्रेस मजबूत झाली पाहिजे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांचे मी आभार मानतो.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress leader prithviraj chavan statement shivsena bjp alliance