esakal | प्रणिति शिंदेंच्या एकाधिकारशाहीला कंटाळले नेते 
sakal

बोलून बातमी शोधा

Praniti Shinde

महापालिका अन लोकभेतील पराभवाला प्रणितीच जबाबदार
महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती करुन सत्ता मिळविण्याची संधी असतानापण आमदार प्रणिती शिंदे यांनी युती न करता स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. युती करावी असा नेत्यांचा आग्रह होता मात्र, शिंदे यांनी स्वबळाचा निर्णय घेतला आणि सत्ता गेली. लोकसभा निवडणुकीत विजयाची खात्री असतानाही आमदार शिंदे यांनी सर्व नेत्यांना सोबत घेतले नाही, अशी चर्चा आहे. कॉंग्रेस नेत्यांच्या पक्षांतरच्या निर्णयामुळे आता आमदार प्राणिती शिंदे यांचा विजय अनिश्चित मानला जात आहे.

प्रणिति शिंदेंच्या एकाधिकारशाहीला कंटाळले नेते 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : लोकसभा निवडणुकीतील मोदी त्सुनामी आणि मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला जनतेचा प्रतिसादाचा अंदाज घेऊन आगामी विधानसभेत काँग्रेसमधून आपण निवडून येऊ शकत नाही याची खात्री वाटू लागलेले सोलापुरातील काँग्रेसचे नेते पक्षांतर करणार आहेत. आमदार प्रणिती शिंदे यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून आमदार भारत भालके, सिद्धाराम म्हेत्रे आणि माजी आमदार दिलीप माने लवकरच शिवसेना व भाजपत प्रवेश करणार आहेत, अशी चर्चा आहे.

वंचित बहुजन आघाडीची दमदार एण्ट्री आणि त्याचा विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला बसणारा फटका, या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपत प्रवेश केला असून आता काँग्रेसमधील आमदार व माजी आमदार आता शिवसेना, भाजपच्या वाटेवर आहेत. दरम्यान, सोलापुरातील कॉंग्रेसमधील आमदारांच्या पक्षांतरच्या चर्चा असतानाही काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांनी त्याकडे लक्ष न देता दुर्लक्षच केल्याचे दिसून येते. काँग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी लोकसभेतील पराभवानंतर सोलापुरातील राजकीय घडामोडींकडे लक्ष दिले नाही.

सोलापूर बाजार समितीच्या सभापती निवडीत त्याचा प्रत्यय आला. या पार्श्वभूमीवर आपले राजकीय भवितव्य धोक्यात असल्याची जाणीव आणि त्याचा फटका आगामी विधानसभा निवडणुकीत निश्चितपणे बसेल म्हणून हे नेते पक्षांतर करत आहेत. तर आमदार प्रणिती शिंदे यांची एकाधिकारशाहीदेखील या पक्षांतराला कारणीभूत आहेत, असाही सूर कॉंग्रेस नेत्यांमधून निघत आहे.

महापालिका अन लोकभेतील पराभवाला प्रणितीच जबाबदार
महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती करुन सत्ता मिळविण्याची संधी असतानापण आमदार प्रणिती शिंदे यांनी युती न करता स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. युती करावी असा नेत्यांचा आग्रह होता मात्र, शिंदे यांनी स्वबळाचा निर्णय घेतला आणि सत्ता गेली. लोकसभा निवडणुकीत विजयाची खात्री असतानाही आमदार शिंदे यांनी सर्व नेत्यांना सोबत घेतले नाही, अशी चर्चा आहे. कॉंग्रेस नेत्यांच्या पक्षांतरच्या निर्णयामुळे आता आमदार प्राणिती शिंदे यांचा विजय अनिश्चित मानला जात आहे.

loading image
go to top